Shopping cart

Latest 2024 अजिंठा लेणी ची माहिती मराठीत | Ajanta Caves information in Marathi

 • Home
 • Marathi Blog
 • Latest 2024 अजिंठा लेणी ची माहिती मराठीत | Ajanta Caves information in Marathi

अजिंठा लेणी ची माहिती मराठी मध्ये बघा. (Ajanta Caves Information in Marathi)

अजिंठा लेणी ची माहिती मराठी मध्ये (Ajanta Caves Information in Marathi) बघत असतांना आपण पुढील टॉपिक आपण बघणार आहोत.

 1. छत्रपती संभाजीनगर ची अजिंठा लेणी
 2. अजिंठा लेणी चा शोध कसा लागला?
 3. लेणीपर्यंत पोहोचण्याच्या प्रवासाचे वर्णन
 4. अजिंठा लेणी का प्रसिद्ध आहेत?
 5. अजिंठा लेणी मध्ये किती लेणी आहेत?
 6. लेणी चा आकार कसा आहे ?
 7. अजिंठा लेणी बघण्याचा काय टाईम आहे ?
 8. अजिंठा लेणीचे तिकीट किती आहे ?
 9. लेणी कुठे आहे ?
 10. अजिंठा लेणी बनवण्याचा काय उद्देश आहे?

छत्रपती संभाजीनगर ची अजिंठा लेणी (Ajintha Leni Information in Marathi)

अजिंठा लेणी ची माहिती मराठी मध्ये (Ajintha Leni Information in Marathi) बघतांना सर्वात आधी हे बघणे गरजेचे आहे की अजिंठा लेणी हि सध्याच्या छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे ह्या जिल्ह्याचे नाव औरंगाबाद होते.) जिल्ह्यात महाराष्ट्र मध्ये स्थित आहे.

भारतीय तसेच विदेशी पर्यटकांना आपल्या देखण्या रूपाने मोहित करणारी अजिंठा हि लेणी जरी इ.स. पूर्व २ ते ४ शतकात निर्माण झाली असली तरी आजही तिची सुंदरता सर्वाना आकर्षित करते. बोद्ध धम्माचा वारसा अवघ्या जगाला दाखवणारी हि लेणी आहे.

भारतातील सर्वात जुनी लेणी म्हणून ओळख असणारी अजिंठा लेणी वाघुर नदीच्या काठावर वसलेली आहे.

हि लेणी सातवाहन राजवंश्याच्या आणि वाकाटक राजघराण्यांच्या काळात बनवली असावी असे इतिहासकार म्हणतात.

या लेण्यात अनेक महत्त्वाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अवशेष आहेत, जे महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाचे ठरतात.

सांस्कृतिक माहितीच्या आधारावर हा ठेवा जपण्यासाठी अजिंठा लेणीस 1983 साली संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) युनोस्कोने जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट केले.

1983 साली अजिंठा लेणी बरोबरच वेरूळ लेणी, आग्रा येथील ताजमहालआग्रा किल्ला ह्या ४ वास्तू सांस्कृतिक माहिती देणाऱ्या आहेत ह्या कारणाने जपल्या जाव्यात म्हणून जागतिक वारसा स्थळे म्हणून घोषित केल्या.

अजिंठा लेणी चा शोध कसा लागला? (How were the Ajanta Caves discovered? in Marathi)

23 सप्टेंबर 1803 रोजी दुसरे इंग्रज व मराठे युद्ध यांच्यात आसईची लढाई झाली त्यादरम्यान इंग्रजांनी आपल्या जखमी सैनिकांना उपचारासाठी अजिंठा गावाजवळच आश्रय घेतला त्या घटनेनंतर त्या ठिकाणी इंग्रज सैनिकांचा वावर निर्माण झाला.

ह्या प्रदेशाचा आसपास चा परिसर हा जंगल झाडांनी व्यापलेला असल्या मुळे जंगली प्राणी व हिंसक प्राण्यांसाठी देखील ह्या प्रदेशात वास्तव करत .

त्याच परिसरात वाघांची संख्या देखील त्या काळी जास्त होती त्या वेळेस त्या ठिकाणी वाघाच्या शिकारीसाठी मद्रास प्रांताचे नेटिव्ह अधिकारी जॉन स्मिथ 28 एप्रिल 1819 वाघुर नदीकाठच्या जंगलात गेले.

शिकार करत असतांना अचानक त्यांना सध्याच्या अजिंठा लेणी मधील लेणी क्रमांक 10 आढळून आली.

सर्व परिसराची शोधमोहीम जॉन स्मिथ यांनी घेतली व शोधात विशेष लक्ष दिले. असता अखंड विशाल काय दगडात कोरलेली अजिंठा लेणी चा शोध लागला.

आजही अजिंठा लेणी मधील लेणी क्रमांक 10 वर त्यांची स्वाक्षरी देखील आढळून येते.

ह्या लेणीच्या शोधास 28 एप्रिल 2023 रोजी तब्बल 204 वर्ष पूर्ण झालेले आहेत.

अजिंठा लेणीपर्यंत पोहोचण्याच्या प्रवासाचे वर्णन (Description of journey to reach Ajanta Caves)

अजिंठा लेणी बघण्यासाठी पूर्ण 1 दिवस लागतो

छत्रपती संभाजीनगर च्या मुख्य बस स्थानकापासून सिल्लोड अथवा भोकरदन मार्गे 100 ते 110 किलोमीटर अंतरावर अजिंठा गावाजवळ अजिंठा लेणी आहे.

हे अंतर आपण स्वतच्या वाहनाने रस्त्याच्या मार्गाने, MSRTC बस ने अथवा टैक्सी बुक करून अजिंठा लेणी पर्यंत पोहचू शकता.

वेळ वाचविण्यासाठी टैक्सी बुक करणे अगदी सोयीस्कर ठरते.

टैक्सी बुक करण्यासाठी येथे क्लिक करा.

जाण्यासाठी 3 ते 4 तास लागतात. (त्यात चहा नाश्ता साठी लागणारा वेळ समाविष्ट)

लेणी बघण्यासाठी 4-5 तास कालावधी लागू शकतो.

अजिंठा लेणी का प्रसिद्ध आहेत? (Why is Ajanta Caves famous?)

Ajanta Caves Buddha Painting
 • अजिंठा लेणी चा उद्धार हा बोद्ध राजाच्या काळात झाला असावा.
 • कारण येथे गौतम बुद्धाच्या जन्मापासून ते महापरिनिर्वाण पर्यंतच्या सर्व प्रवास सांगणारी भित्ती चित्रे व बुद्धांच्या दगडात कोरलेल्या भावमुद्रा आपणास बघायला मिळतात.
 • अजिंठा लेणीत गौतम बुद्धांचा सर्व जीवनपट आपणास बघण्यास मिळतो.
 • येथे गौतम बुद्धांच्या भावमुद्रा तसेच पेटिंग बघण्यास मिळतात.
 • अजिंठा लेणीत स्त्रियांची भावचित्रे कलाचीत्रे तसेच राणी, अप्सरा, दासी व सामान्य स्त्रियांची चित्रे तसेच राजा, गरीब संन्यासी, झाडे, फुले व फळे यांची देखील शिल्प व चित्र त्याकाळात देखील भितींवर कलरने रेखाटलेले दिसते.
 • अजिंठा लेणी मध्ये गौतम बुद्धांचा सर्व भावमुद्रा व अप्रतिम शिल्पकला तसेच अजिंठा लेण्यांमध्ये बौद्ध आणि जैन पंथीयांनी सजावटीचे नक्षीकाम केले आहे, जी मानवी इतिहासातील कलेचा उत्कृष्ट काळ दर्शवते.
 • यामुळे ह्या लेण्या अगदी इतिहास काळापासूनच प्रसिद्ध आहेत.

अजिंठा लेणी मध्ये किती लेणी आहेत ? (How many caves are there in Ajanta Caves?)

अजिंठा लेणीत ऐकून ३० लेण्या आहेत त्या मधील 30 नंबर लेणी हि अर्धवट बनवलेली आहे म्हणून २९ लेणी आहेत .

२९ लेणी मधील ४ चैत्यगृह जे सर्वांसाठी प्रार्थना करण्यासाठी आहेत व २५ विहार आहेत जे बुद्ध भिख्खू साठी निवास गृहे बनवलेली आहेत.

अजिंठा लेणी चा आकार (The Shape of Ajanta Caves.)

लेणीचा आकार हा आकाशातून बघितले असता घोड्याच्या नालाकृती दिसतो जो बहुतांश रुपी घोड्याच्या पायाच्या नालासारखा दिसतो.

लेणीच्या पायथ्याशीच वाघुर नदी गेलेली आहे जिच्या आसपास चा प्रदेश हा जंगल झाडांनी वेढलेला आहे.

अजिंठा लेणी पाहण्यासाठी वेळ / अजिंठा लेणी कधी बंद असते? (Time to visit Ajanta Caves.)

दिवसवेळ
सोमवारदर सोमवारी अजिंठा लेणी बंद असते.
मंगळवारसकाळी 9:00 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत उघडी असते.
बुधवारसकाळी 9:00 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत उघडी असते.
गुरुवारसकाळी 9:00 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत उघडी असते.
शुक्रवारसकाळी 9:00 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत उघडी असते.
शनिवारसकाळी 9:00 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत उघडी असते.
रविवारसकाळी 9:00 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत उघडी असते.
*तसेच सार्वजनिक सुट्टी च्या दिवशी देखील अजिंठा लेणी बंद असते.

अजिंठा लेणी पाहण्यासाठी तिकीट दर

भारतीय नागरिकप्रति व्यक्ती 35
सार्क देशांतील नागरिकप्रति व्यक्ती 35
विदेशी पर्यटकप्रति व्यक्ती 550
0-15 वर्षाखालील मुलांसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही

अजिंठा लेणी कुठे आहे?

महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर मधील सिल्लोड तालुक्यातील अजिंठा गावाजवळ अजिंठा लेणी स्थित आहे.

अजिंठा लेणी बनवण्याचा प्रमुख उद्देश

 • बुद्ध भिक्षुंना आणि सामान्य जनतेस ध्यान, उपासना, चिंतन करण्याचे ते एक उत्तम स्थान असावे म्हणून अजिंठा लेणीचा उद्धार करण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर ते अजिंठा लेणी टैक्सी बुक करा

  Read More

  महाराष्ट्राची पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) बघण्याचे नियोजन करा आमच्या सोबत:

  महाराष्ट्रातील पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरातील ऐतिहासिक स्थळांची सैर करण्यासाठी प्रवाशांच्या विशिष्ट गरजा आणि प्राधान्यतेप्रमाणे.

  आम्ही एकटे प्रवासी, कुटुंबे आणि सर्व आकारांच्या गटांना सामावून घेणाऱ्या आलिशान सेडानपासून ते प्रशस्त SUV पर्यंत विविध सर्व प्रकारच्या सुव्यवस्थित वाहनांची टैक्सी सेवा प्रदान करतो.

  विमानतळ हस्तांतरणापासून ते शहराच्या सहलीपर्यंत आणि त्याही पुढे, आम्ही आमच्या सेवा तुमच्या प्रवासाच्या कार्यक्रमानुसार तयार करतो.

  सर्व प्रसिद्ध ऐतिहासीक स्थळांसाठी टैक्सी सेवा देतो. तुम्ही या लेखामध्ये औरंगाबाद ऐतिहासिक शहरात काय प्रसिद्ध आहे? जाणून घ्या ह्या प्रश्नाचे उत्तर खालील उताऱ्या मध्ये :

  • 11. पैठण चे नाथ सागर धरण
  • 12. सोनेरी महल
  • 13. छत्रपती शिवाजी संग्रहालय
  • 14. प्रोजोन मॉल
  • 15. सलीम अली तलाव आणि पक्षी अभयारण्य
  • 16. कैलास मंदिर
  • 17. औरंगजेबाची कबर (खुलताबाद)
  • 18. खंडोबा मंदिर
  • 19. साई टेकडी घाट
  • 20. जैन मंदिर (कचनेर)
  • 21. म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण
  • 22. H२O वॉटर पार्क
  • 23. भांगसी माता गड
  • 24. मलिक अंबर कबर
  • 25. नवसाला पावणारा राजुरेश्वर गणपती
  • 26. लोकुत्तरा महाविहार, (चौका औरंगाबाद)
  • 27. संत एकनाथ महाराज समाधी मंदिर

  ह्या पेक्ष्या अधिक स्थळांना भेट देण्यासाठी आम्ही औरंगाबाद शहरातून तुमच्या पोहचण्याच्या स्थळापर्यंत टैक्सी ची सेवा आपणास उपलब्ध करून देतो. अनुभवी आणि एक्स्पर्ट चालकांसोबत आपण ऐतिहासिक पर्यटन नगरीची सैर करा.

  अद्विका टैक्सी ला आत्ताच बुक करा आणि आपले औरंगाबाद शहर किवा त्या बाहेरील स्थळांना भेट द्या . चला मग कळवा तुमचा ट्रीप चा प्लान अद्विका टैक्सी ला 9359604272 वर कॉल करून.

  Comments are closed