Shopping cart

सोनेरी महाल

सोनेरी महल औरंगाबाद (Soneri Mahal Marathi information)

 • “सोनेरी महाल औरंगाबाद” ची ऐतिहासिक पार्श्वभुमी :
 • सोनेरी महलची रचना :
 • सोनेरी महाल ला “सोनेरी महाल” नाव पडण्याचे कारण :
 • सोनेरी महल चे सौंदर्य प्रभावीत करणारे घटक :
 • सोनेरी महल उघडण्याची / बघण्याची वेळ
 • सोनेरी महलचे तिकीट दर :
 • महाराष्ट्राची पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) बघण्याचे नियोजन :

सोनेरी महाल

“सोनेरी महाल औरंगाबाद” ची ऐतिहासिक पार्श्वभुमी :

 • सोनेरी महल हि वास्तू छत्रपती संभाजीनगर मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मध्ये स्थित आहे.
 • छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती बस स्थानकापासून अगदी जवळच ६ किमी अंतरावर ह्या ऐतिहासिक वास्तूचे सोंदर्य बघायला मिळते.
 • ही वास्तू मुघल आणि राजपूत वास्तू शैलीचा एक उत्तम इतिहासकालीन उदाहरण आहे.
 • सोनेरी महल ही औरंगजेबाच्या काळातील बुंदेलखंड चा सरदार पहाडसिंग ने स्वत:च्या वास्तव्यासाठी सन १६५१ ते १६५३ या कालावधीत निर्माण केले.
 • त्या काळातील साधारण ५०,००० रुपयांच्या खर्चात हा महल बांधला गेला असावा, असे अनुमानित ठरवले जाते.
 • मुघल साम्राज्याचा जमीनदार व ओरछा राज्याचा शासक “सवाई महेंद्र वीरसिंहदेव बहादुर” ने सोनेरी महल १९३४ साली हैदराबाद संस्थानाच्या निजामास २६,४०० रुपयांना विकला. असे मूळ कींमतीच्या अंदाजावरून ठरवले जाते.

सोनेरी महलची रचना :

 • सोनेरी महलची रचना आयताकृती आहे. सर्व महलाच्या बाहेरील बाजूने संरक्षक भिंत आहे. बाहेरील परिसरात प्रवेशद्वारासमोर हाथीखाना आहे.
 • आत मध्ये प्रवेश केल्यावर दोन मंजिल असलेली सोनेरी महल चे दृश्य दिसते. खालच्या मजल्यावर दालन आहे.
 • चारही दिशात चार खोल्या आहेत. खालच्या बरंड्यात जुन्या देवतांच्या मूर्ती पर्यटकांसाठी बघण्यास ठेवल्या आहेत.
 • खालच्या मजल्यावरून वरती जाण्यासाठी जिना आहे, वर जाताना नक्षीदार भिंतीवर कलाकृती दिसते.
 • येथे ३ ऐतिहासीक तोफा, जुन्या मूर्ती शिल्प, चित्रे, दागिने,  जुनी मातीची भांडी, शस्त्रे, तलवारी आहेत .
 • मराठवाड्याच्या विविध भागातून तसेच पैठण व तेर येथील उत्खनात सापडलेल्या वस्तू संग्रहित केल्या आहेत.
 • १९७९ मध्ये ह्या वास्तूस प्रादेशिक वास्तू संग्रहालय म्हणून मान्यता मिळाली.
 • महलच्या दर्शनी भागात आपनास पहाडसिंगचा चुलत भाऊ “लाला हरदौल” स्मृती समाधी आहे.
 • लाला हरदौल हा बुंदेलखंडचा मोठा स्वातंत्र सेनानी होता तो मुघल अन्याया विरुद्ध लढणारा स्वातंत्र सैनानी होता.
 • येथे त्यांची चबुतऱ्याची समाधी व ऐतिहासिक पायऱ्यांची विहीर आहे.

सोनेरी महाल ला “सोनेरी महाल” नाव पडण्याचे कारण :

सोनेरी महलाच्या आतील भिंतींवर मुघल कालीन चित्रे काढलेली आहेत, हि चित्रे खऱ्या सोन्याच्या पाण्याने रंगवलेली आहेत. म्हुणुन ह्या वास्तूस “सोनेरी महल” हे नाव पडले. ह्या चित्रात मुघल कालीन चित्रे जी पाने, फुले, झाडे निसर्गाची चित्रे, फुलदाण्याची चित्रे दर्शवतात. आजही ह्या चित्रांची भव्यता प्रखलीत दिसते.

सोनेरी महल चे सौंदर्य प्रभावीत करणारे घटक :

सोनेरी महल च्या पाठीमागील भागात सातमाळा डोंगर रांग आहे. पश्चिम भागात गोगा बाबा डोंगर आणि उत्तरेकडील भागात बुद्ध लेण्या व समोरील बाजूस म्हणजेच पूर्वेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे.

चारही बाजूने निसर्गाचे दर्शन होते. ज्या मुळे ह्या वास्तू चे सौदर्य आणखी खुलुन दिसते. येथील परिसर हा निसर्गाच्या सानिग्ध्यात वसलेला आहे.

त्या मुळे शहरातील लोक ह्या भागात सतत मोकळा वेळ घालवण्यासाठी येत असतात. सकाळी ह्या भागात आरोग्याची काळजी करणारे लोकांची वर्दळ असते.

दिवसा पर्यटक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मधील विद्यार्थ्यांची वर्दळ येथे बघण्यास मिळते. येथील मोकळ्या जागेत संध्याकाळच्या वेळी खेळाडूंची गर्दी देखील येथे दिसते. आसपास चा सर्व परिसर हा पर्यटक ठिकाणांचा आहे.

सोनेरी महल उघडण्याची / बघण्याची वेळ
वारउघडण्याची वेळबंद होण्याची वेळ
मंगळवारसकाळी 9:00 तेसंध्याकाळी 5:00 पर्यंत
बुधवारसकाळी 9:00 तेसंध्याकाळी 5:00 पर्यंत
गुरुवारसकाळी 9:00 तेसंध्याकाळी 5:00 पर्यंत
शुक्रवारसकाळी 9:00 तेसंध्याकाळी 5:00 पर्यंत
शनिवारसकाळी 9:00 तेसंध्याकाळी 5:00 पर्यंत
रविवारसकाळी 9:00 तेसंध्याकाळी 5:00 पर्यंत
टीप: सोमवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सोनेरी महल बंद असतो.
सोनेरी महलचे तिकीट दर :
 • भारतीय नागरिकांसाठी 10 रु. प्रति व्यक्ती
 • परदेशी नागरिकांसाठी 100 रु प्रति व्यक्ती

Read More

महाराष्ट्राची पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) बघण्याचे नियोजन करा आमच्या सोबत:

महाराष्ट्रातील पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरातील ऐतिहासिक स्थळांची सैर करण्यासाठी प्रवाशांच्या विशिष्ट गरजा आणि प्राधान्यतेप्रमाणे.

आम्ही एकटे प्रवासी, कुटुंबे आणि सर्व आकारांच्या गटांना सामावून घेणाऱ्या आलिशान सेडानपासून ते प्रशस्त SUV पर्यंत विविध सर्व प्रकारच्या सुव्यवस्थित वाहनांची टैक्सी सेवा प्रदान करतो.

विमानतळ हस्तांतरणापासून ते शहराच्या सहलीपर्यंत आणि त्याही पुढे, आम्ही आमच्या सेवा तुमच्या प्रवासाच्या कार्यक्रमानुसार तयार करतो.

सर्व प्रसिद्ध ऐतिहासीक स्थळांसाठी टैक्सी सेवा देतो. तुम्ही या लेखामध्ये औरंगाबाद ऐतिहासिक शहरात काय प्रसिद्ध आहे? जाणून घ्या ह्या प्रश्नाचे उत्तर खालील उताऱ्या मध्ये :

 • 11. पैठण चे नाथ सागर धरण
 • 12. सोनेरी महल
 • 13. छत्रपती शिवाजी संग्रहालय
 • 14. प्रोजोन मॉल
 • 15. सलीम अली तलाव आणि पक्षी अभयारण्य
 • 16. कैलास मंदिर
 • 17. औरंगजेबाची कबर (खुलताबाद)
 • 18. खंडोबा मंदिर
 • 19. साई टेकडी घाट
 • 20. जैन मंदिर (कचनेर)
 • 21. म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण
 • 22. H२O वॉटर पार्क
 • 23. भांगसी माता गड
 • 24. मलिक अंबर कबर
 • 25. नवसाला पावणारा राजुरेश्वर गणपती
 • 26. लोकुत्तरा महाविहार, (चौका औरंगाबाद)
 • 27. संत एकनाथ महाराज समाधी मंदिर

ह्या पेक्ष्या अधिक स्थळांना भेट देण्यासाठी आम्ही औरंगाबाद शहरातून तुमच्या पोहचण्याच्या स्थळापर्यंत टैक्सी ची सेवा आपणास उपलब्ध करून देतो. अनुभवी आणि एक्स्पर्ट चालकांसोबत आपण ऐतिहासिक पर्यटन नगरीची सैर करा.

अद्विका टैक्सी ला आत्ताच बुक करा आणि आपले औरंगाबाद शहर किवा त्या बाहेरील स्थळांना भेट द्या . चला मग कळवा तुमचा ट्रीप चा प्लान अद्विका टैक्सी ला 9359604272 वर कॉल करून.

  Comments are closed