24+ फेमस औरंगाबाद पर्यटन स्थळे

औरंगाबाद पर्यटन स्थळे (Aurangabad Madhil Paryatan Sthal)

औरंगाबाद शहर ही महाराष्ट्राची पर्यटन राजधानी आहे. या शहराला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. कारण औरंगाबाद शहरात 24 हून अधिक प्रमुख पर्यटन स्थळे आहेत, ती आपण पुढे पाहू.

या ऐतिहासिक शहराला सुट्टीच्या दिवसात भेट द्यायची असेल तर औरंगाबादमधील प्रसिद्ध आणि प्रमुख पर्यटन स्थळे (Aurangabad Madhil Paryatan Sthal) कोणती आहेत आणि तिथे कसे जायचे, टॅक्सी सुविधा काय आहेत,

कोणती टॅक्सी बुक करावी? किंवा या लेखात आम्ही तुम्हाला औरंगाबादच्या पर्यटन स्थळांबद्दल महत्त्वाची अचूक माहिती देत आहोत. जर तुम्ही तुमच्या सुट्टीत औरंगाबादच्या पर्यटन स्थळांना भेट देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही हा लेख जरूर वाचा, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

त्याआधी जाणून घेऊया औरंगाबाद शहराचे नाव सध्या छत्रपती संभाजीनगर आहे. त्या संदर्भात पुढील लेख वाचा, औरंगाबाद शहरातील सर्व ऐतिहासिक व औरंगाबाद पर्यटन स्थळे पाहण्यासाठी लेखाच्या शेवटी काही महत्त्वाचे लेख आहेत, ते जरूर वाचा, व भेट देण्यापूर्वी आम्हला नक्की कळवा फायदा तुम्हालाच होईल. चला तर मग हा लेख पाहूया.

1. अजिंठा लेणी

अजिंठा लेणी येथे, आपण दगडात कोरलेली भिंत चित्रे आणि बुद्धांचे भाव पाहू शकता, जे गौतम बुद्धांच्या जन्मापासून ते महापरिनिर्वाणापर्यंतच्या संपूर्ण प्रवासाबद्दल सांगतात.

संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) द्वारे जागतिक वारसा स्थळ म्हणून सूचीबद्ध.

या लेणी पाहण्यासाठी देशी-विदेशी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते.

विस्तृत लेख वाचा

अजिंठा लेणी

2. वेरूळ लेणी

वेरूळ लेणी

बौद्ध, जैन व हिंदू त्रिवेणी संगम असणारी लेणी म्हणजेच एलोरा/ वेरूळ लेणी.

येथे पवित्र असे कैलास मंदिर, गौतम बुद्ध व जैन धर्मीय २३ वे तीर्थकार पार्श्वनाथ यांची विशाल शिल्प मूर्ती बघायला मिळते.

हि लेणी विशाल काय एक संलग्न खडकात कोरलेली आहे . येथे ऐकून ३४ लेण्या आपणास बघायला मिळतात.

3. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग

घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील १२ वे आणि अंतिम ज्योतिर्लिंग. भक्त घुश्मा च्या विनंती मुळे भगवान शिवशंकर येथे पावन झाले.

हे ज्योतिर्लिंग जगप्रसिद्ध वेरूळ लेणी जवळ आहे. त्यामुळे येथे भाविक पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते.

ज्योतिर्लिंग मध्ये शिवशंकारचे पौराणिक मंदिर आहे व जवळच ‘‘ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शिवालय तीर्थ कुंड’’ आहे.

विस्तृत लेख वाचा

घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग
4. भद्रा मारुती मंदिर
भद्रा मारुती मंदिर औरंगाबाद

भद्रा मारुती मंदिर हे प्रसिद्ध हिंदू धर्मीय हनुमान मंदिर आहे. येथील हनुमानजीची मूर्ती शयनावस्थेत आहे.

प्रत्येक हनुमान जयंती, चैत्र पौर्णिमेच्या दिवशी राम नवमी, श्रावण महिन्यात आणि हिंदू सणाच्या शुभ प्रसंगात येथे प्रचंड प्रमाणात भाविक गर्दी असते.

भाविकांनी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या दर्शनास आल्यावर ह्या पवित्र स्थळावर भाविक भेट देतात.

5. औरंगाबाद लेणी

६ व्या व 7 व्या शतकात निर्माण झालेली लेणी ही बोद्ध लेणी आहे, येथे 12 लेणी आहेत डोंगरच्या मृदू खडकात कोरलेल्या आहेत.

येथे बुद्ध मूर्तींनी सजलेला परिसर धम्माचे तत्त्वज्ञान सागतो, बोद्ध भिकुंची निवासस्थाने बघण्यास मिळतात.

हा परिसर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जवळ असल्यामुळे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची वर्दळ नेहमी असते.

औरंगाबाद लेणी फोटो

6. गौताळा औटराम घाट अभयारण्य

गौताळा अभयारण्य औरंगाबाद

निसर्गाची सहल करायची म्हटले की गौताळा औटराम घाट अभयारण्य नक्कीच बघावे.

चंदनाची झाडे अभयारण्यात बिबटे, हरीण, नीलगाय, ससे, मोर, लांडगे, चितळ, तरस, कोल्हे, काळवीट, रानडुकरे, सांबर, गवे, भेकर असे प्राणी आहेत.

पशुपक्षी, वृक्षवेली आणि वनौषधी यांनी गौताळा अभयारण्य समृद्ध आहे. येथे प्रसिद्ध असे सिताखोरी धबधबा बघायला मिळतो.

येथे नैसर्गिक दृश्य टिपण्यासाठी पर्यटक या ठिकाणी येत असतात.

7. म्हैसमाळ

महाराष्ट्राच्या थंड हवेच्या ठिकाणांमधील म्हैसमाळ हे एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे, हे छत्रपती संभाजीनगर मध्ये स्थित आहे.

१०६७ मीटर उंचीवर सह्याद्रीच्या पर्वत रांगते वसलेले आहे, येथे निसर्गात फोटोग्राफी करणे आणि एकांत वेळ घालवण्यासाठी पर्यटक ह्या ठिकाणी जातात.

म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण
8. औरंगजेबाची कबर
औरंगजेबाची कबर

शेख जैनुद्दीनच्या दर्ग्या मध्ये मोगल सम्राट औरंगजेबाची कबर बनवण्यात आली होती.

एवढ्या मोठ्या सम्राटाची एवढी साधी कबरीपुढे औरंगझेबाचा साधेपणा लगेच जाणवतो.

कारण हि कबर बनवण्यासाठी स्वत: कमावलेल्या टोपी शिवण्याच्या कामातून मिळालेल्या आठ रुपयात त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या गुरु शेख जैनुद्दीनच्या जवळच त्यांची कबर बांधली गेली. हे ठिकाण खुलताबाद जवळ आहे .

12. दौलताबाद किल्ला

भारतातील कोणत्याही राजाला जिंकता न आलेला किल्ला राजा भिल्लमा पाचवा याने बांधलेला दौलताबादचा देवगिरी किल्ला होय.

सभासदाने याचे वर्णन ‘‘ दुर्गम दुर्ग देवगिरी हा पृथ्वीवरील चखोट गड खरा परंतु तो उंचीने थोडका ’’असे केलेले आहे. 

किल्ल्याचा सुरक्षतेच्या दुर्ष्टीने खूप महत्वचा किल्ला म्हणून ओळख आहे. येथे स्वातंत्र प्राप्तीचे प्रतिक भारतमाता मंदिर बघायला मिळते.

दौलताबाद किल्ला फोटो

13. बीबी का मकबरा

बीबी का मकबरा फोटो

दख्खनचा ताजमहाल म्हणून प्रसिद्ध असलेला बीबी का मकबरा नेहमीच प्रेमाचे प्रतीक म्हणून पर्यटकांच्या ओठांवर असतो.

औरंगजेबाचा मुलगा आझम शाह याने त्याची आई राबिया दुर्रानी यांच्या स्मरणार्थ बीबी का मकबरा बांधला,.

जिथे त्यांची कबर आहे. ताजमहालची प्रतिकृती म्हणून प्रसिद्ध बीबी का मकबरा बघण्यासाठी पर्यटकांचे नेहमी आकर्षण असते.

14. बनी बेगम गार्डन

औरंगजेबाची सून बनी बेगम यांची कबर असलेले हे ठिकाण येथील गोलघुमट आणि नक्षीकाम केलेले मनोरे चे नमुने बघण्यासाठी प्रसिद्ध आहे.

येथे हिरवीगार झाडे आणि सुंदर कारंजे बघण्यासाठी वेळ घालवणे म्हणजे मनाला शांतात देते.

बनी बेगम बाग
15. पानचक्की
पानचक्की औरंगाबाद माहिती

शहराचा मध्य भागात स्थित असलेली पानचक्की देशी-विदेशी पर्यटक आवर्जून बघत असतात. कारण पाण्याचा प्रवाहाणे येथील चक्की चे पाते बारमाही फिरत असतात.

येथे आयताकृती जलाशय बघायला मिळते. हि पानचक्की पूर्वीच्या लोकांची विज्ञानाची सांगड कशी होती हे बघण्यासाठी व अभ्यास करण्यासाठी हे ठिकाण एक वेगळी जागा दाखवते.

16. हिमायत बाग

ही बाग हिरवाई आणि थंड वातावरणामुळे पर्यटकांचे आकर्षण आहे. १७ व्या शतकातील ही बाग अभियांत्रिकीचा एक अद्भुत पराक्रम आहे.

ज्यामध्ये भूमिगत पाण्याच्या कक्षेचा समावेश आहे. येथे बारा दरी हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी (महाराष्ट्र) च्या अधिपत्याखाली असेलेल फळ संशोधन केंद्र आहे, जेथे चिंच आंब्याची रोपे व झाडे बघायला मिळतात.

हिमायत बाग

17. सोनेरी महल

सोनेरी महल

खर्या सोन्याच्या पाण्याने रंगवलेली चित्रे व जुन्या वस्तुसंग्रहालय बघण्यासाठी सोनेरी महल हि वास्तू अगदी काल्पनिक वाडा असलेली वाटते.

ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात स्थित निसर्गाच्या सानिग्ध्यात असलेला हा महल परिवारासोबत मोकळ्या जागेत वेळ घालवण्यासाठी छान आहे.

विस्तृत लेख वाचा

18. जामा मशीद

औरंगाबादमधील किल्ला अराकजवळ वसलेली प्रसिद्ध जामा मशीद, शहराच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा दाखला आहे.

तिची भव्य इस्लामिक वास्तुकला अभ्यागतांना मोहित करते, ज्यामुळे ते या प्रदेशातील एक आदरणीय खूण आहे.

औरंगाबादमधील सर्वात मोठी आणि मध्यवर्ती मशीद म्हणून, ती मुघल काळात बांधली गेली आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने काळजीपूर्वक पुनर्संचयित केलेली, गहन ऐतिहासिक महत्त्व आहे.

जामा मशीद औरंगाबाद
19. कॅनॉट प्लेस
कॅनॉट प्लेस औरंगाबाद

कॅनॉट प्लेस छत्रपती संभाजीनगर मधील दुकानदारांचे नंदनवन आहे.

हे ठिकाण महत्वाचे ठिकाण आहे, कारण येथे मोठ्या बँका सार्वजनिक कार्यालये आणि चांगले मल्टिप्लेक्स, प्रोझोन मॉल, कारसाठी शोरूम्स,

सोन्याच्या दागिन्यांची शोरूम्स, मोबाईल फोनची बाजारपेठ, जेवणासाठी स्वादिष्ट हॉटेल, कपड्यांची दुकाने, आणि लोकांना दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या जवळपास सर्व गोष्टी येथे मिळतात.

20. प्रोज़ोन मॉल

ऋतिक रोशन च्या हस्ते उद्घाटन झालेला “प्रोज़ोन मॉल” हा छत्रपती संभाजीनगर मधील सर्वात मोठा शॉपिंग मॉल आहे.

येथे स्वयंचलित  पायऱ्या द्वारे संचलन होते.

त्यामुळे वृद्ध आणि तरुणांना हा मॉल नेहमी आकर्षित करतो.

येथे नेहमी फेस्टिवलमध्ये आकर्षक ऑफर दिल्या जातात.

घरगुती सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे, चैनीच्या वस्तू, कपडे, दैनंदिन जिवनाच्या उपयोगी वस्तु, चविष्ट पदार्थ खाण्यासाठी लोकांची येथे नेहमी गर्दी असते.

प्रोज़ोन मॉल

21. सिद्धार्थ गार्डन आणि प्राणीसंग्रहालय

सिद्धार्थ गार्डन आणि प्राणी संग्रहालय औरंगाबाद महाराष्ट्र

सिद्धार्थ गार्डन आणि प्राणीसंग्रहालय हे स्थान परिवारासोबत बघण्यासारखे आहे.

लहान मुलांना मोकळ्या गार्डन मध्ये खेळणे, प्राणी दाखवणे, विविध प्रकारचे मासे, कारंजे बघण्यासाठी छत्रपती संभाजी नगरची सर्वात वर्दळ ठिकाणावर मध्यवर्ती बसस्थानकाजवळ हे स्थान आहे.

एक साप्ताहिक सुट्टीचा आनंद घेण्यासाठी योग्य आहे. येथे मुलांना पाळीव प्राणी, शिकारी प्राणी, जलचर प्राणी, सर्पालय, पक्षीघर, पिवळे/पांढरे वाघ, काळवीट, चितळ, सांबर, नीलगाय, इमू यांसारखे प्राणी बघण्यासाठी व मुलांना खेळण्यासाठी अत्यंत उत्तम ठिकाण आहे.

22. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय

मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाखाली स्थापित केलेले हे वस्तूसंग्रह म्हणजे त्यांच्यासाठी समर्पित आहे.

येथे मराठा साम्राज्याचे प्राचीन शस्त्रे, पुरातन वस्तूंचा संग्रह, पोशाक, दागिने, वस्त्रे नाणी आणि औरंगजेबाची हाताने लिहिलेली कुराणीची प्रत देखील आपल्याला ह्या संग्रहालयात बघायला मिळते.

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय औरंगाबाद

23. सलीम अली सरोवर

सलीम अली सरोवर

प्रसिद्ध भारतातील आद्य पक्षिशास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी, भारताचे ” Birdman of India” डॉ. सलीम अली यांच्या स्मरणार्थ, छत्रपती संभाजीनगरच्या नियंत्रणाखाली असलेला सलीम अली सरोवर पर्यटकांना व पक्षीप्रेमींसाठी पक्षी निरीक्षणासाठी एक आवडते ठिकाण बघण्यासाठी प्रसिद्ध आहे.

येथे १७४ प्रजातीचे पक्षी आहेत, ज्यात सायबेरिया चे पक्षी देखील बघायला मिळतात. हा तलाव पर्यटकांना नौका नयन आणि पक्षी बघण्यासाठी प्रसिद्ध आहे.

24. जायकवाडी धरण

महाराष्ट्राचा सर्वात मोठा बहुदेशीय प्रकल्प आणि आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण म्हणून प्रसिद्ध असे जायकवाडी धरण छत्रपती संभाजीनगर ची जलवाहिनी चे कार्य करते.

नाथसागर जलाशय मध्ये आठवडी सुट्टीचा आनंद तलावा ठिकाणी घेण्यासाठी हे ठिकाण योग्य आहे.

जायकवाडी धरण

महाराष्ट्राची पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) बघण्याचे नियोजन करा आमच्या सोबत:

महाराष्ट्रातील पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरातील ऐतिहासिक स्थळांची सैर करण्यासाठी प्रवाशांच्या विशिष्ट गरजा आणि प्राधान्यतेप्रमाणे.

आम्ही एकटे प्रवासी, कुटुंबे आणि सर्व आकारांच्या गटांना सामावून घेणाऱ्या आलिशान सेडानपासून ते प्रशस्त SUV पर्यंत विविध सर्व प्रकारच्या सुव्यवस्थित वाहनांची टैक्सी सेवा प्रदान करतो.

विमानतळ हस्तांतरणापासून ते शहराच्या सहलीपर्यंत आणि त्याही पुढे, आम्ही आमच्या सेवा तुमच्या प्रवासाच्या कार्यक्रमानुसार तयार करतो.

सर्व प्रसिद्ध ऐतिहासीक स्थळांसाठी टैक्सी सेवा देतो. तुम्ही या लेखामध्ये औरंगाबाद ऐतिहासिक शहरात काय प्रसिद्ध आहे? जाणून घ्या ह्या प्रश्नाचे उत्तर खालील उताऱ्या मध्ये :

चला मग बघूया औरंगाबाद शहरात काय प्रसिद्ध आहे?

  • 11. पैठण चे नाथ सागर धरण
  • 12. सोनेरी महल
  • 13. छत्रपती शिवाजी संग्रहालय
  • 14. प्रोजोन मॉल
  • 15. सलीम अली तलाव आणि पक्षी अभयारण्य
  • 16. कैलास मंदिर
  • 17. औरंगजेबाची कबर (खुलताबाद)
  • 18. खंडोबा मंदिर
  • 19. साई टेकडी घाट
  • 20. जैन मंदिर (कचनेर)
  • 21. म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण
  • 22. H२O वॉटर पार्क
  • 23. भांगसी माता गड
  • 24. मलिक अंबर कबर
  • 25. नवसाला पावणारा राजुरेश्वर गणपती
  • 26. लोकुत्तरा महाविहार, (चौका औरंगाबाद)
  • 27. संत एकनाथ महाराज समाधी मंदिर

ह्या पेक्ष्या अधिक स्थळांना भेट देण्यासाठी आम्ही औरंगाबाद शहरातून तुमच्या पोहचण्याच्या स्थळापर्यंत टैक्सी ची सेवा आपणास उपलब्ध करून देतो. अनुभवी आणि एक्स्पर्ट चालकांसोबत आपण ऐतिहासिक पर्यटन नगरीची सैर करा.

अद्विका टैक्सी ला आत्ताच बुक करा आणि आपले औरंगाबाद शहर किवा त्या बाहेरील स्थळांना भेट द्या . चला मग कळवा तुमचा ट्रीप चा प्लान अद्विका टैक्सी ला 9359604272 वर कॉल करून.

खालील ब्लॉगला अवश्य भेट द्या

अद्विका टॅक्सी का निवडावी ?
  • आरामदायी आणि सुस्थितीत असलेली वाहने
  • व्यावसायिक आणि विनम्र ड्रायव्हर्स
  • तुमच्या प्राधान्यांनुसार तयार केलेली लवचिक टूर पॅकेज
  • त्रास-मुक्त बुकिंग प्रक्रिया
  • कोणतेही छुपे शुल्क न घेता परवडणारे दर

Advika Taxi  ने छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) भेटीचा पुरेपूर फायदा घ्या. तुम्ही इतिहासप्रेमी असाल, स्थापत्य प्रेमी असाल किंवा निसर्गाचे प्रेमी असाल, आमच्या टॅक्सी सेवा हे सुनिश्चित करतात की आम्ही औरंगाबाद शहरापासून तुमच्या इच्छित स्थळापर्यंत अखंड अनुभव देतो.

अनुभवी आणि तज्ञ ड्रायव्हर्ससह ऐतिहासिक पर्यटन शहर एक्सप्लोर करा.

आत्ताच Advika Taxi बुक करा आणि औरंगाबाद शहर किंवा आसपासची ठिकाणे एक्सप्लोर करा. Advika Taxi  ला 9359604272 वर कॉल करून तुमचा सहलीचा प्लॅन शेअर करा.

Comments are closed