दक्षिणेतील ताजमहल-बीबी का मकबराची सर्व माहिती मराठीत बघा वेळ, तिकीट, पोहचण्याचा रस्ता-मार्ग, जवळील पर्यटन स्थळे, इतिहास.

  • Home
  • Marathi Blog
  • दक्षिणेतील ताजमहल-बीबी का मकबराची सर्व माहिती मराठीत बघा वेळ, तिकीट, पोहचण्याचा रस्ता-मार्ग, जवळील पर्यटन स्थळे, इतिहास.

बीबी का मकबरा: “Bibi ka Maqbara information in Marathi”

भारताच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा महत्त्वपूर्ण घटकामधील एक ठिकाण म्हणजेच दक्षिणेतील ताजमहल ज्याची ओळख असलेला छत्रपती संभाजीनगर ( पूर्वीच्या औरंगाबाद शहरातील) “बीबी का मकबरा” हे स्मारक म्हणून प्रसिद्ध आहे, ह्या स्मारकास “दक्षिणेतील ताजमहल” असे देखील म्हणतात.

बीबी का मकबरा” ही वास्तू पूर्वीच्या औरंगाबाद, सध्याच्या छत्रपती संभाजीनगर शहरातील बेगमपुरा नगरामध्ये, खांब नदीजवळ स्थित आहे. येथेच जवळच औरंगाबाद लेणी, पानचक्की, सोनेरी महल यांसारख्या प्रसिद्ध वास्तू देखील आहेत.

म्हणून ‘Bibi ka Maqbara information in Marathi’ हा ब्लॉग पाहणे खूपच मजेदार आहे. चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया.

“बीबी का मकबरा: ‘दक्षिणेतील ताजमहल’ चा ऐतिहासिक वारसा – बीबी का मकबरा मराठी माहिती”

“बीबी का मकबरा मराठी माहिती” मध्ये आपण ह्या वास्तू चा इतिहासाबद्दल बोलणे गरजेचे आहे. ही वास्तू आग्राच्या ‘ताजमहल’ ची प्रतिकृती आहे. हा अत्यंत सुंदर आणि मोहक मकबरा 1676 मध्ये मुघल शासक औरंगजेबाच्या काळात बांधला गेला. हि वास्तू औरंगजेब आणि त्याची मुख्य पत्नी रबिया-उल-दौरानी (दिलरास बानो बेगम) यांच्या मुलगा आजम शहाने आपल्या आईच्या स्मरणार्थ ‘बीबी का मकबरा’ म्हणून बांधली.

या वास्तूची कल्पना आजम शहाला मुघल सम्राट शाहजहांकडून मिळाली, ‘बीबी का मकबरा’ च्या स्थापत्यकलेमुळे हे छत्रपती संभाजीनगर हे शहर एक ऐतिहासिक आकर्षण बनले आहे, जे इतिहासप्रेमी, वास्तुकला रसिक, आणि देशी तसेच विदेशी पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.

बीबी का मकबरा बांधण्याचे कारण ?

बीबी का मकबरा बांधण्याचे कारण असे आहे की, १६५७ मध्ये आजम शाहची आई दिलरास बानो बेगम यांची तब्येत खूप बिघडली आणि ८ ऑक्टोबर १६५७ रोजी त्यांचे निधन झाले.

त्याआधी, मोहम्मद आजम शाहचे आजोबा शाहजहां यांनी आपल्या पत्नी बेगम मुमताजच्या स्मरणार्थ ताजमहलची निर्मिती केली होती. या प्रेरणेतून आजम शाहने आपल्या प्रिय आई ‘रबिया-उल-दौरानी’ (दिलरास बानो बेगम) यांच्या स्मरणार्थ औरंगाबादमध्ये ताजमहलच्या वास्तूशी साधर्म्य साधणारे ‘बीबी का मकबरा’ बांधण्याचा निर्णय घेतला.

बीबी का मकबराचे बांधकाम.

बीबी का मकबऱ्याची निर्मिती ताजमहलच्या प्रतिकृतीसारखी करण्यासाठी प्रसिद्ध वास्तूकार उस्ताद अहमद लाहोरी यांचा मुलगा ‘अत्ता-उल-अल्ला’ यांच्याकडून करण्यात आली. प्रसिद्ध वास्तुविशारद ‘अत्ता-उल-अल्ला’ यांनीच ताजमहल ची निर्मिती देखील केली होती. मकबऱ्याचे बांधकाम 1660 मध्ये पूर्ण झाले होते.

बीबी का मकबराची स्थापत्यकला आणि डिझाइन

बीबी का मकबरा व ताजमहल ह्या मध्ये साम्यता असावी पण खर्च कमी असावा म्हणून बीबी का मकबरा चा फक्त कळस चे बांधकाम पांढऱ्या संगमरवरात बांधले गेले आहे.

बीबी का मकबरा मध्ये संगमरवरचा कमी प्रमाणात वापर झाला आहे.

बीबी का मकबरा बांधण्यात लाल आणि काळा दगड, तसेच मुख्य गोल घुमटासाठी संगमरवर वापरले गेले आहे. भिंतींना पांढऱ्या मातीच्या मिश्रणाचे प्लास्टर करून नक्षीदार आणि सुशोभित केले आहे.

असे प्लास्टर ‘स्टको प्लॅस्टर (Stucco Plaster)’ म्हणून ओळखले जाते.

हे भारतातील दुसरे ताजमहल म्हणून ओळखले जाते कारण येथे हुबेहूब ताजमहलसारखाच भव्य मकबरा बांधला आहे. मुख्य घुमट संगमरवर बनवलेला आहे आणि भिंतींवर तसेच घुमटावर नाजूक नक्षीकाम केलेले आहे. येथेच मधोमध आजम शाहची प्रिय आई दिलरास बानो बेगम यांची कबर आहे. कबरीच्या वरच्या बाजूस असणाऱ्या नक्षीदार खिडक्यांमधून सकाळी सूर्याची किरणे आणि रात्री चंद्राचा प्रकाश कबरीवर पडेल अशी रचना प्रसिद्ध वास्तूविशारद ‘अत्ता-उल-अल्ला’ यांनी केली आहे.

बीबी का मकबरातील बाग आणि परिसर

बीबी का मकबऱ्याभोवती एक विस्तीर्ण बाग आहे, ज्यामध्ये मुघल शैलीतील चारबाग रचना आहे. बागेत फुलांची सुंदर ताटवे, फवारे, आणि पाण्याचे वाहते झरे आहेत, जे शांतता आणि सौंदर्याचे प्रतीक आहेत. बागेतून चालताना पर्यटकांना मुघल काळातील शांतता आणि भव्यतेची अनुभूती येते.

चार कोपऱ्यात उभे असलेले मिनार यामुळे हे स्मारक ताजमहलची आठवण करून देते. मात्र, बीबी का मकबऱ्याचे डिजाईनचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याची साधेपणा आणि मुघल वास्तुकलेचा हा ऐतिहासिक सुंदर नमुना आहे.

बीबी का मकबऱ्याचे पर्यटन आणि सांस्कृतिक महत्त्व

बीबी का मकबरा हे छत्रपती संभाजीनगर (पूर्वीच्या औरंगाबाद) मधील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. छत्रपती संभाजीनगर ही महाराष्ट्राची पर्यटन राजधानी आहे, आणि दरवर्षी येथे हजारो देशी तसेच विदेशी पर्यटक भेट देतात. बीबी का मकबरा हे समृद्ध मुघल कालीन इतिहासाच्या स्थापत्यकलेच्या वारशाचे प्रतीक आहे.

हा मकबरा भारतातील दुसरा ताजमहल म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे, त्याच्या स्थापत्यशैलीमुळे आणि इतिहासामुळे, बीबी का मकबरा फोटोग्राफर्स, इतिहासप्रेमी, आणि कलाकारांसाठी एक प्रेरणादायी ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहे. ‘Bibi ka Maqbara information in Marathi’ या संदर्भात, हे ठिकाण अत्यंत महत्त्वाचे आणि विशेष आहे.

बीबी का मकबरा: एक अभिमानाची वारसा

बीबी का मकबरा हा भारताच्या समृद्ध मुघल संस्कृतीचा इतिहास आणि मुघल साम्राज्याच्या स्थापत्य परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. याचे सौंदर्य, शिल्पकला, आणि इतिहास यामुळे हे एक अद्वितीय स्मारक बनले आहे.

म्हणूनच, बीबी का मकबरा हा छत्रपती संभाजीनगरचा एक अभिमानास्पद वारसा आहे, जो आजही लोकांच्या मनात विशेष स्थान राखून आहे.

बीबी का मकबराचे ठिकाण

स्थानबेगमपुरा
जिल्हाछत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
राज्यमहाराष्ट्र
पोस्ट ऑफिसऔरंगाबाद
पिन कोड431004
देशभारत

बीबी का मकबऱ्याला भेट देण्याची वेळ (Bibi Ka Maqbara Timings)

वारउघडण्याची वेळबंद होण्याची वेळ
रविवारसकाळी 08 वाजता पर्यटकांसाठी खुली होते.संध्याकाळी 08 वाजता बंद होते.
सोमवारसकाळी 08 वाजता पर्यटकांसाठी खुली होते.संध्याकाळी 08 वाजता बंद होते.
मंगळवारसकाळी 08 वाजता पर्यटकांसाठी खुली होते.संध्याकाळी 08 वाजता बंद होते.
बुधवारसकाळी 08 वाजता पर्यटकांसाठी खुली होते.संध्याकाळी 08 वाजता बंद होते.
गुरुवारसकाळी 08 वाजता पर्यटकांसाठी खुली होते.संध्याकाळी 08 वाजता बंद होते.
शुक्रवारसकाळी 08 वाजता पर्यटकांसाठी खुली होते.संध्याकाळी 08 वाजता बंद होते.

बीबी का मकबऱ्याचे तिकीट दर (Bibi Ka Maqbara Ticket Price)

भारतीय नागरिकांसाठीऑफलाइन काउंटर तिकीट दर25  रु. प्रति व्यक्ती
ऑनलाइन तिकीट दर20  रु. प्रति व्यक्ती
सार्क देशांचे नागरिक (बांग्लादेश, नेपाल, भूटान, श्रीलंका, पाकिस्तान, मालदीव व अफगाणिस्तान)ऑफलाइन काउंटर तिकीट दर25  रु. प्रति व्यक्ती
ऑनलाइन तिकीट दर20  रु. प्रति व्यक्ती
बिमस्टेक देशांचे नागरिक (बांगलादेश, नेपाळ, भूटान श्रीलंका, थायलॅन्ड व म्यानमार)ऑफलाइन काउंटर तिकीट दर25  रु. प्रति व्यक्ती
ऑनलाइन तिकीट दर20  रु. प्रति व्यक्ती
परदेशी पर्यटकऑफलाइन काउंटर तिकीट दर300  रु. प्रति व्यक्ती
ऑनलाइन तिकीट दर250  रु. प्रति व्यक्ती
०-१५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही

बीबी का मकबऱ्यास कशी भेट द्यायची रस्ता-मार्ग? (How to reach Bibi Ka Maqbara?)

बीबी का मकबरा पाहण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यावे लागते. येथे पोहोचण्यासाठी तीन मार्ग आहेत.

१. हवाई वाहतूक
२. रेल्वे वाहतूक
३. रस्ते वाहतूक

१. हवाई वाहतूक

Havai Vahtuk

छत्रपती संभाजीनगर मध्ये येण्यासाठी आपण हवाई वाहतूकीचा प्रवास निवडू शकता.
येथे औरंगाबाद विमानतळ (IXU) नावाचे विमानतळ आहे.
ह्या ठिकाणी दिल्ली, हैद्राबाद, मुंबई साठी डायरेक्ट उडाने होतात.
ह्या ठिकाणी पोहचल्यावर आपण पुढील दोन पर्याय वापरून बीबी का मकबरा पर्यंत पोहचू शकता.
१. महाराष्ट्र शासनाच्या (MSRTC) बस ने बीबी का मकबरा ला जाऊ शकता.
२.टैक्सी बुकिंग करून आपण तेथे जाऊ शकता.
(* वेळ वाचवण्यासाठी टैक्सी बुकिंग हा पर्याय योग्य आहे.)
टैक्सी बुकिंग करण्यासाठी येथे क्लिक करा.

2. रस्ते वाहतूक

Raste Vahtuk

रस्ते वातुकीचा मार्ग हा स्वत: च्या वाहनाद्वारे किंवा महाराष्ट्र शासनाच्या (MSRTC) बस सेवेचा वापर करून आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रवेश करू शकता.
रस्ते वातुकीने बस सेवेचा वापर करून छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती बस स्थानका पर्यंत पोहचू शकता.
त्यानंतर
१. महाराष्ट्र शासनाच्या (MSRTC) बस ने बीबी का मकबरा ला जाऊ शकता.
२.टैक्सी बुकिंग करून आपण तेथे जाऊ शकता.
(* वेळ वाचवण्यासाठी टैक्सी बुकिंग हा पर्याय योग्य आहे.)
टैक्सी बुकिंग करण्यासाठी येथे क्लिक करा.

3.रेल्वे वाहतूक

RAilway Vahtuk

रेल्वे मार्गाने येण्यासाठी आपणास येथील औरंगाबाद(AWB) रेल्वे स्टेशन ला यावे लागेल.
औरंगाबाद रेल्वे स्टेशन हे मनमाड जंक्शन व हजूर साहिब नांदेड जंक्शन दरम्यानचे मोठे स्टेशन आहे.
ह्या मार्गावर रोज अजंठा एक्स्प्रेस, निजामाबाद-पुणे एक्स्प्रेस, मराठवाडा एक्स्प्रेस, सचखंड एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस, नागरसोल एक्स्प्रेस, पुणे एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेस, हजूर साहिब नांदेड-मनमाड डेमू, मुंबई CSMT राजा राणी एक्स्प्रेस ह्या गाड्या रोज चालत असतात.
ह्या स्टेशन वरून बीबी का मकबरा पर्यंतचा प्रवास
१. महाराष्ट्र शासनाच्या (MSRTC) बस ने वेरूळ लेणी ला जाऊ शकता.
२.टैक्सी बुकिंग करून आपण तेथे जाऊ शकता.
(* वेळ वाचवण्यासाठी टैक्सी बुकिंग हा पर्याय योग्य आहे.)
टैक्सी बुकिंग करण्यासाठी येथे क्लिक करा.

बीबी का मकबरा जवळील पर्यटन स्थळे:

१. औरंगाबाद लेणी (बीबी का मकबरापासून ३.५ किमी अंतरावर स्थित)

२. पानचक्की (बीबी का मकबरापासून २.३ किमी अंतरावर स्थित)

३. सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय (बीबी का मकबरापासून ४.३ किमी अंतरावर स्थित)

४. दौलताबाद किल्ला (बीबी का मकबरापासून १६.५ किमी अंतरावर स्थित)

५. भद्रा मारुती मंदिर (बीबी का मकबरापासून २७.५ किमी अंतरावर स्थित)

६. वेरूळ लेणी (बीबी का मकबरापासून २९.५ किमी अंतरावर स्थित)

७. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग (बीबी का मकबरापासून ३०.२ किमी अंतरावर स्थित)

बीबी का मकबरा जवळील पर्यटन स्थळे:टॅक्सीने बघण्यासाठी टॅक्सी दर:

(बीबी का मकबरा, औरंगाबाद लेणी, पानचक्की, सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय, दौलताबाद किल्ला, भद्रा मारुती मंदिर, वेरूळ लेणी, आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग या सर्व ठिकाणांचे टॅक्सी ट्रिप फक्त २६०० रुपये पासून सुरु होते.)

कॅबचा प्रकार आणि पॅकेजेसचे भाडे तपशील:

१. सेडान (ETIOS/ DESIRE) भाडे – रु. २६००/-

२. एसयूव्ही (इर्टिगा टॅक्सी) भाडे – रु. ३५००/-

३. प्रीमियम एसयूव्ही (इनोव्हा) भाडे – रु. ४२००/-

४. प्रीमियम एसयूव्ही (INNOVA CRYSTA) भाडे – रु. ५०००/-

५. व्हॅन (टेम्पो ट्रॅव्हलर) भाडे – रु. ६५००/-

तुमचा ट्रीप चा प्लान अद्विका टैक्सी ला 9359604272 वर कॉल करून.

    Read More

    महाराष्ट्राची पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) बघण्याचे नियोजन करा आमच्या सोबत:

    महाराष्ट्रातील पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरातील ऐतिहासिक स्थळांची सैर करण्यासाठी प्रवाशांच्या विशिष्ट गरजा आणि प्राधान्यतेप्रमाणे.

    आम्ही एकटे प्रवासी, कुटुंबे आणि सर्व आकारांच्या गटांना सामावून घेणाऱ्या आलिशान सेडानपासून ते प्रशस्त SUV पर्यंत विविध सर्व प्रकारच्या सुव्यवस्थित वाहनांची टैक्सी सेवा प्रदान करतो.

    विमानतळ हस्तांतरणापासून ते शहराच्या सहलीपर्यंत आणि त्याही पुढे, आम्ही आमच्या सेवा तुमच्या प्रवासाच्या कार्यक्रमानुसार तयार करतो.

    सर्व प्रसिद्ध ऐतिहासीक स्थळांसाठी टैक्सी सेवा देतो. तुम्ही या लेखामध्ये औरंगाबाद ऐतिहासिक शहरात काय प्रसिद्ध आहे? जाणून घ्या ह्या प्रश्नाचे उत्तर खालील उताऱ्या मध्ये :

    • 11. पैठण चे नाथ सागर धरण
    • 12. सोनेरी महल
    • 13. छत्रपती शिवाजी संग्रहालय
    • 14. प्रोजोन मॉल
    • 15. सलीम अली तलाव आणि पक्षी अभयारण्य
    • 16. कैलास मंदिर
    • 17. औरंगजेबाची कबर (खुलताबाद)
    • 18. खंडोबा मंदिर
    • 19. साई टेकडी घाट
    • 20. जैन मंदिर (कचनेर)
    • 21. म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण
    • 22. H२O वॉटर पार्क
    • 23. भांगसी माता गड
    • 24. मलिक अंबर कबर
    • 25. नवसाला पावणारा राजुरेश्वर गणपती
    • 26. लोकुत्तरा महाविहार, (चौका औरंगाबाद)
    • 27. संत एकनाथ महाराज समाधी मंदिर

    ह्या पेक्ष्या अधिक स्थळांना भेट देण्यासाठी आम्ही औरंगाबाद शहरातून तुमच्या पोहचण्याच्या स्थळापर्यंत टैक्सी ची सेवा आपणास उपलब्ध करून देतो. अनुभवी आणि एक्स्पर्ट चालकांसोबत आपण ऐतिहासिक पर्यटन नगरीची सैर करा.

    अद्विका टैक्सी ला आत्ताच बुक करा आणि आपले औरंगाबाद शहर किवा त्या बाहेरील स्थळांना भेट द्या . चला मग कळवा तुमचा ट्रीप चा प्लान अद्विका टैक्सी ला 9359604272 वर कॉल करून.

    Comments are closed