Latest 2024 दौलताबाद देवगिरी किल्ल्याची संपूर्ण माहिती। Daulatabad Fort information in Marathi

  • Home
  • मराठी ब्लॉग
  • Latest 2024 दौलताबाद देवगिरी किल्ल्याची संपूर्ण माहिती। Daulatabad Fort information in Marathi

Daulatabad Killa chi Mahiti | Daulatabad Fort information in Marathi

Daulatabad Fort information in Marathi मध्ये आपण अशा किल्ल्याबद्दल माहिती घेणार आहोत, देवगिरी जो किल्ला कधीही कुणालाही युद्धात जिंकता आला नाही. “जिंकता आला” म्हणजे फक्त कुणाच्या तरी फितुरीने किंवा विश्वासघाताने जिंकता आला असेल.

या किल्ल्यात अवघ्या 2000 सैनिकांनी 50,000 सैनिकांचा पराभव केला. असा नावलौकिक पराक्रमी इतिहास बघायला मिळतो. चला तर मग बघूया दौलताबाद किल्ल्याची माहिती (Daulatabad Killa chi Mahiti) आणि त्याच्या ऐतिहासिक महत्त्वाबद्दल पुढील माहिती.

दौलताबाद किल्ल्याचे मूळ नाव देवगिरी किल्ला आहे, येथील सभोतालच्या डोंगरावर भगवान शंकराचे वास्तव्य होते असे म्हणतात, त्यामुळे या किल्ल्याला देवगिरी किल्ला म्हटले गेले असावे. देवाच्या डोंगराला देवगिरी म्हणतात.

देवगिरी किल्ला इतिहास मराठी (Devagiri Fort History in Marathi)

छत्रपती संभाजीनगर मधील दौलताबाद गावाजवळ देवगिरी किल्ला स्थित आहे. हा किल्ला इतिहासात खूप महत्त्वाचा आहे. दौलताबाद याचा उल्लेख इतिहासात सभासदाने याचे वर्णन ‘‘दुर्गम दुर्ग देवगिरी हा पृथ्वीवरील चखोट गड खरा परंतु तो उंचीने थोडका’’ असे सखोल केलेले वर्णन आहे.

  • दौलताबाद किल्ल्याचा इतिहास हा पराक्रम, युद्धनीती आणि रणनीती यांचा उत्तम नमुना आहे.
  • 1327 मध्ये मोहम्मद बिन तुघलकाने दिल्लीची राजधानी दौलताबादला हलवली, हे दाखवते की हा किल्ला किती महत्त्वाचा होता. त्यानंतर अनेक राजवंशांनी हा किल्ला आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना तो युद्धाने कधीच जिंकता आला नाही.
  • किल्ल्याची निर्मिती: यादव घराण्यातील भिल्लम राजा पाचवा याने जवळपास 1187 मध्ये देवगिरी ह्या किल्ल्याची निर्मिती केली .
  • दौलताबाद नाव : 1308 मध्ये दिल्लीचा सुलतान अलाउद्दीन खिलजीने या शहरावर कब्जा केला व 1327 मध्ये तुघलकाने ह्या शहराचे नाव दौलताबाद ठेवले.
  • अहमदनगर सल्तनतचा भाग: 1499 मध्ये, दौलताबाद हा प्रदेश अहमदनगर सल्तनतचा भाग बनला गेला
  • यादव घराण्यापासून ते निजामशाही पर्यंत अनेक राज्यांनी कर्तृत्व बघितलेला हा किल्ला पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो.

Daulatabad Killa chi Mahiti : दौलताबाद च्या देवगिरी किल्ल्यातील रचना

  • दौलताबाद किल्ल्या मध्ये अनेक मंदिरे , मस्जिद, तोफा , विहिरी, दगडी शिल्पे, चांदमिनार, भारतमाता मंदिर , गणेश मंदिर, मेंढा तोफ, दुर्गा तोफ, दगडी गुहा, बुलंद दरवाजे, खंदक , पायरी विहीरी, हत्ती हौद अश्या अनेक इतिहास कालीन वास्तूंची रचना देवगिरी किल्यात बघायला मिळते .
  • सर्वात शक्तिशाली किल्ल्यांपैकी एक : 200 मीटर उंच आणि शंख-आकाराच्या सातमाळा टेकडीच्या माथ्यावर बांधलेला हा किल्ला 12 व्या शतकातील देवगिरी किल्ला हा एक अभेद्य आणि अद्वितीय वास्तुकलेचा नमुना आहे. दौलताबादचा देवगिरी किल्ला मध्ययुगीन काळातील सर्वात शक्तिशाली किल्ल्यांपैकी एक आहे.
  • चांद मिनार : बहमनी शासक हसन गंगूने दिल्लीतील कुतुबमिनारची प्रतिकृती म्हणून देवगिरी किल्ल्यात चांद मिनार बांधला. ह्या मध्ये तीन मिनाराकृती एक मिनार आहे आणि शेवटी एक घुमटाकार कळस अशी चांदमिनारची प्रतिकृती बनवली आहे .
Chand Minar
  • गणेश मंदिर : देवगिरी किल्याचा वरती भगवान गणेश यांचे मंदिर बांधलेले आहे .

दौलताबाद च्या देवगिरी किल्ल्याची वैशिष्ट्ये

Deogiri fort khandak
मेंढा तोफ

1. मजबूत बांधकाम : किल्ल्याचे बांधकाम इतके भक्कम आहे की ते कोणत्याही शत्रूपासून सुरक्षित राहिले आहे.

2. युद्धनीती : किल्ल्याच्या रक्षणासाठी वापरलेल्या युद्धनीतींमुळे हा किल्ला अजेय राहिला आहे.

  • तीन कोट : दौलताबाद च्या किल्ल्याला सुरक्षेच्या दृष्टीने तीन घेरे आहेत यास कोट म्हणतात. येथे असे तीन कोट आहेत त्यांना खालील प्रमाणे नावे आहेत.
    • १. काला कोट
    • २. अंबर कोट
    • ३. महाकोट
  • गडाच्या चारही बाजूंना 40 फूट खंदक आहे, : तो पाण्याने भरलेला असे त्यात मगरी, साप असत, शत्रूने कोणत्याही मार्गाने किल्ल्यावर पोहोचू नये, ही सुरक्षा इथे पाहायला मिळते.
    • खंदकावरून किल्यात जाण्यासाठी फक्त १ च पूल असे जर शत्रू पुढे आलाच तर पूल उचलल्या जाई आणि सुरक्षित केला जाई.
    • जरी पुलावरून शत्रू पुढे गेलाच तर पुढे रस्त्याचा पुष्कळ भूलभुलैया असलेल्या रस्ते दिसतात. व गडावर असेलेले सैनिक तीक्ष्ण धनुष्य बाणाने वॉर करून शत्रूस पुढे येऊ देत नसत.
  • मेंढा तोफ : देवगिरी किल्यावर एका दगडी बुरुजावर शत्रूंच्या पूर्ण तुकडीस हानी पोहचवेल अशी मेंढ्या च्या तोंडाच्या आकाराची मेंढा तोफ आहे. हि तोफ इतिहासातील युद्धाचे रणांगण गाजवणारी तोफ म्हणतात.
  • खंदकाच्या पुलावरून जरी शत्रू पुढे गेला तर पुढे अंधारातील रस्ते बघायला मिळतात येथे शत्रूवर उकळते तेल फेकून जाळ्यात अडकवण्याची एक ट्रॅप बनवलेला आहे.
  • दुर्गा तोफ : देवगिरी किल्ल्याच्या सर्वोच्च शिखरावर दुर्गा तोफ आहे. या तोफेच्या माध्यमातून गडाच्या सर्व भागांवर सुरक्षेसाठी नजर ठेवण्यात येत असे.

3. सैनिकांची वीरता : अवघ्या २००० सैनिकांनी ५०,००० शत्रूसैनिकांचा पराभव केला होता, ही घटना किल्ल्याच्या पराक्रमाची साक्ष देते.

4. अत्यंत गुंतागुंतीचा भुलभुलैया असलेला हा किल्ला आहे. कारण शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी येथे भरपूर सुरक्षा पहायला मिळते.

5.राष्ट्रीय स्मारकाच्या यादीतील किल्ला : दौलताबाद येथील देवगिरी किल्ल्यास २८ नोव्हेंबर, १९५१ मध्ये शासनाने याचे जतन आणि संवर्धन व्हावे म्हणून राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.

दौलताबाद किल्ला हा भारतीय इतिहासातील एक अमूल्य रत्न आहे. त्याचा इतिहास, पराक्रम आणि अजिंक्यता यामुळे तो आजही लोकांच्या मनात आपले विशेष स्थान ठेवून आहे.

दौलताबाद किल्ला बघण्याची वेळ (Devagiri / Daulatabad Fort Aurangabad Visit Timings)

वारकिल्ला उघडण्याची वेळकिल्ला बंद होण्याची वेळ
सोमवारसकाळी 09 वाजता पर्यटकांसाठी खुली होते.संध्याकाळी 06 वाजता बंद होते.
मंगळवार
बुधवार
गुरुवार
शुक्रवार
शनिवार
रविवार

दौलताबाद किल्ला तिकीट दर (Daulatabad Killa chi Ticket Price)

भारतीय नागरिकांसाठी25 रु. प्रति व्यक्ती
सार्क देशांचे नागरिक (बांग्लादेश, नेपाल, भूटान, श्रीलंका, पाकिस्तान, मालदीव व अफगाणिस्तान)25 रु. प्रति व्यक्ती
बिमस्टेक देशांचे नागरिक (बांगलादेश, नेपाळ, भूटान श्रीलंका, थायलॅन्ड व म्यानमार)25 रु. प्रति व्यक्ती
इतर सर्व देशातील परदेशी पर्यटक300 रु. प्रति व्यक्ती
कॅमेरा25 रु.
 0-15 वय वर्ष असणाऱ्या सर्वांना देवगिरी किल्ल्या मध्ये प्रवेश निःशुल्क आहे.

देवगिरी किल्ल्यास कशी भेट द्यायची ? (How to reach Devagiri Fort?)

देवगिरी किल्ला पाहण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यावे लागते. येथे पोहोचण्यासाठी तीन मार्ग आहेत.

१. हवाई वाहतूक
२. रेल्वे वाहतूक
३. रस्ते वाहतूक

१. हवाई वाहतूक
Havai Vahtuk
  • छत्रपती संभाजीनगर मध्ये येण्यासाठी आपण हवाई वाहतूकीचा प्रवास निवडू शकता.
  • येथे औरंगाबाद विमानतळ (IXU) नावाचे विमानतळ आहे.
  • ह्या ठिकाणी दिल्ली, हैद्राबाद, मुंबई साठी डायरेक्ट उडाने होतात.
  • ह्या ठिकाणी पोहचल्यावर आपण पुढील दोन पर्याय वापरून देवगिरी किल्ला पर्यंत पोहचू शकता.
  • १. महाराष्ट्र शासनाच्या (MSRTC) बस ने वेरूळ लेणी ला जाऊ शकता.
  • २.टैक्सी बुकिंग करून आपण तेथे जाऊ शकता.
    (* वेळ वाचवण्यासाठी टैक्सी बुकिंग हा पर्याय योग्य आहे.)
  • टैक्सी बुकिंग करण्यासाठी येथे क्लिक करा.
३. रस्ते वाहतूक
Raste Vahtuk
  • रस्ते वातुकीचा मार्ग हा स्वत: च्या वाहनाद्वारे किंवा महाराष्ट्र शासनाच्या (MSRTC) बस सेवेचा वापर करून आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रवेश करू शकता.
  • रस्ते वातुकीने बस सेवेचा वापर करून छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती बस स्थानका पर्यंत पोहचू शकता.
  • त्यानंतर
  • १. महाराष्ट्र शासनाच्या (MSRTC) बस ने वेरूळ लेणी ला जाऊ शकता.
  • २.टैक्सी बुकिंग करून आपण तेथे जाऊ शकता.
    (* वेळ वाचवण्यासाठी टैक्सी बुकिंग हा पर्याय योग्य आहे.)
  • टैक्सी बुकिंग करण्यासाठी येथे क्लिक करा.
२. रेल्वे वाहतूक
RAilway Vahtuk
  • रेल्वे मार्गाने येण्यासाठी आपणास येथील औरंगाबाद(AWB) रेल्वे स्टेशन ला यावे लागेल.
  • औरंगाबाद रेल्वे स्टेशन हे मनमाड जंक्शन व हजूर साहिब नांदेड जंक्शन दरम्यानचे मोठे स्टेशन आहे.
  • ह्या मार्गावर रोज अजंठा एक्स्प्रेस, निजामाबाद-पुणे एक्स्प्रेस, मराठवाडा एक्स्प्रेस, सचखंड एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस, नागरसोल एक्स्प्रेस, पुणे एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेस, हजूर साहिब नांदेड-मनमाड डेमू, मुंबई CSMT राजा राणी एक्स्प्रेस ह्या गाड्या रोज चालत असतात.
  • ह्या स्टेशन वरून देवगिरी किल्ला पर्यंतचा प्रवास
  • १. महाराष्ट्र शासनाच्या (MSRTC) बस ने वेरूळ लेणी ला जाऊ शकता.
  • २.टैक्सी बुकिंग करून आपण तेथे जाऊ शकता.
    (* वेळ वाचवण्यासाठी टैक्सी बुकिंग हा पर्याय योग्य आहे.)
  • टैक्सी बुकिंग करण्यासाठी येथे क्लिक करा.

    दौलताबाद किल्ल्याचे ठिकाण (Location of Daulatabad Fort)

    दौलताबाद किल्ल्याबद्दल वारंवार पडणारे सामान्य प्रश्न

    छत्रपती संभाजीनगर ते देवगिरी किल्ला हे अंतर सुमारे 20 किमी आहे.

    देवगिरी किल्ला सकाळी 09:00 ते संध्याकाळी 06:00 पर्यंत पर्यटकांसाठी खुले असते.

    यादव राजघराण्यातील भिल्लम राजा पाचवा याने जवळपास 1187 मध्ये देवगिरी ह्या किल्ल्याची निर्मिती केली .

    1308 मध्ये दिल्लीचा सुलतान अलाउद्दीन खिलजीने या शहरावर कब्जा केला व 1327 मध्ये तुघलकाने ह्या शहराचे नाव दौलताबाद ठेवले.

    बहमनी शासक हसन गंगूने दिल्लीतील कुतुबमिनारची प्रतिकृती म्हणून देवगिरी किल्ल्यात चांद मिनार बांधला.

    दौलताबाद किल्ल्याचे भारतीय नागरिकांसाठी 25 रु. प्रति व्यक्ती तिकीट आकारले जाते.

    सार्क देशांचे नागरिक (बांग्लादेशनेपालभूटानश्रीलंकापाकिस्तानमालदीव व अफगाणिस्तान) 25 रु. प्रति व्यक्ती तिकीट आकारले जाते.

    बिमस्टेक देशांचे नागरिक (बांगलादेश, नेपाळ, भूटान श्रीलंका, थायलॅन्ड व म्यानमार) 25 रु. प्रति व्यक्ती तिकीट आकारले जाते.

    विदेशी नागरिकांना दौलताबाद किल्ल्याचे 300 रु. प्रति व्यक्ती तिकीट दर आहे .

    दौलताबाद किल्ल्याचे मूळ नाव देवगिरी किल्ला आहे.

    Read More

    महाराष्ट्राची पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) बघण्याचे नियोजन करा आमच्या सोबत:

    महाराष्ट्रातील पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरातील ऐतिहासिक स्थळांची सैर करण्यासाठी प्रवाशांच्या विशिष्ट गरजा आणि प्राधान्यतेप्रमाणे.

    आम्ही एकटे प्रवासी, कुटुंबे आणि सर्व आकारांच्या गटांना सामावून घेणाऱ्या आलिशान सेडानपासून ते प्रशस्त SUV पर्यंत विविध सर्व प्रकारच्या सुव्यवस्थित वाहनांची टैक्सी सेवा प्रदान करतो.

    विमानतळ हस्तांतरणापासून ते शहराच्या सहलीपर्यंत आणि त्याही पुढे, आम्ही आमच्या सेवा तुमच्या प्रवासाच्या कार्यक्रमानुसार तयार करतो.

    सर्व प्रसिद्ध ऐतिहासीक स्थळांसाठी टैक्सी सेवा देतो. तुम्ही या लेखामध्ये औरंगाबाद ऐतिहासिक शहरात काय प्रसिद्ध आहे? जाणून घ्या ह्या प्रश्नाचे उत्तर खालील उताऱ्या मध्ये :

    • 11. पैठण चे नाथ सागर धरण
    • 12. सोनेरी महल
    • 13. छत्रपती शिवाजी संग्रहालय
    • 14. प्रोजोन मॉल
    • 15. सलीम अली तलाव आणि पक्षी अभयारण्य
    • 16. कैलास मंदिर
    • 17. औरंगजेबाची कबर (खुलताबाद)
    • 18. खंडोबा मंदिर
    • 19. साई टेकडी घाट
    • 20. जैन मंदिर (कचनेर)
    • 21. म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण
    • 22. H२O वॉटर पार्क
    • 23. भांगसी माता गड
    • 24. मलिक अंबर कबर
    • 25. नवसाला पावणारा राजुरेश्वर गणपती
    • 26. लोकुत्तरा महाविहार, (चौका औरंगाबाद)
    • 27. संत एकनाथ महाराज समाधी मंदिर

    ह्या पेक्ष्या अधिक स्थळांना भेट देण्यासाठी आम्ही औरंगाबाद शहरातून तुमच्या पोहचण्याच्या स्थळापर्यंत टैक्सी ची सेवा आपणास उपलब्ध करून देतो. अनुभवी आणि एक्स्पर्ट चालकांसोबत आपण ऐतिहासिक पर्यटन नगरीची सैर करा.

    अद्विका टैक्सी ला आत्ताच बुक करा आणि आपले औरंगाबाद शहर किवा त्या बाहेरील स्थळांना भेट द्या . चला मग कळवा तुमचा ट्रीप चा प्लान अद्विका टैक्सी ला 9359604272 वर कॉल करून.

    Comments are closed