सोनेरी महाल औरंगाबाद – ऐतिहासिक वारसा आणि माहिती
“सोनेरी महाल औरंगाबाद” हा छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मधील एक महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा आहे. हा महाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात वसलेला असून, पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. त्याच्या सुंदर वास्तुकलेमुळे आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे “सोनेरी महल औरंगाबाद” पर्यटकांसाठी एक उत्तम स्थळ आहे.
“सोनेरी महाल औरंगाबाद” ची ऐतिहासिक पार्श्वभुमी :
- सोनेरी महल हि वास्तू छत्रपती संभाजीनगर मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मध्ये स्थित आहे.
- छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती बस स्थानकापासून अगदी जवळच ६ किमी अंतरावर ह्या ऐतिहासिक वास्तूचे सोंदर्य बघायला मिळते.
- ही वास्तू मुघल आणि राजपूत वास्तू शैलीचा एक उत्तम इतिहासकालीन उदाहरण आहे.
- सोनेरी महल ही औरंगजेबाच्या काळातील बुंदेलखंड चा सरदार पहाडसिंग ने स्वत:च्या वास्तव्यासाठी सन १६५१ ते १६५३ या कालावधीत निर्माण केले.
- त्या काळातील साधारण ५०,००० रुपयांच्या खर्चात हा महल बांधला गेला असावा, असे अनुमानित ठरवले जाते.
- मुघल साम्राज्याचा जमीनदार व ओरछा राज्याचा शासक “सवाई महेंद्र वीरसिंहदेव बहादुर” ने सोनेरी महल १९३४ साली हैदराबाद संस्थानाच्या निजामास २६,४०० रुपयांना विकला. असे मूळ कींमतीच्या अंदाजावरून ठरवले जाते.
सोनेरी महलची रचना :

- सोनेरी महलची रचना आयताकृती आहे. सर्व महलाच्या बाहेरील बाजूने संरक्षक भिंत आहे. बाहेरील परिसरात प्रवेशद्वारासमोर हाथीखाना आहे.
- आत मध्ये प्रवेश केल्यावर दोन मंजिल असलेली सोनेरी महल चे दृश्य दिसते. खालच्या मजल्यावर दालन आहे.
- चारही दिशात चार खोल्या आहेत. खालच्या बरंड्यात जुन्या देवतांच्या मूर्ती पर्यटकांसाठी बघण्यास ठेवल्या आहेत.
- खालच्या मजल्यावरून वरती जाण्यासाठी जिना आहे, वर जाताना नक्षीदार भिंतीवर कलाकृती दिसते.
- येथे ३ ऐतिहासीक तोफा, जुन्या मूर्ती शिल्प, चित्रे, दागिने, जुनी मातीची भांडी, शस्त्रे, तलवारी आहेत .
- मराठवाड्याच्या विविध भागातून तसेच पैठण व तेर येथील उत्खनात सापडलेल्या वस्तू संग्रहित केल्या आहेत.
- १९७९ मध्ये ह्या वास्तूस प्रादेशिक वास्तू संग्रहालय म्हणून मान्यता मिळाली.
- महलच्या दर्शनी भागात आपनास पहाडसिंगचा चुलत भाऊ “लाला हरदौल” स्मृती समाधी आहे.
- लाला हरदौल हा बुंदेलखंडचा मोठा स्वातंत्र सेनानी होता तो मुघल अन्याया विरुद्ध लढणारा स्वातंत्र सैनानी होता.
- येथे त्यांची चबुतऱ्याची समाधी व ऐतिहासिक पायऱ्यांची विहीर आहे.
- सोनेरी महलाच्या आतील भिंतींवर मुघल कालीन चित्रे काढलेली आहेत, हि चित्रे खऱ्या सोन्याच्या पाण्याने रंगवलेली आहेत. म्हुणुन ह्या वास्तूस “सोनेरी महल” हे नाव पडले. ह्या चित्रात मुघल कालीन चित्रे जी पाने, फुले, झाडे निसर्गाची चित्रे, फुलदाण्याची चित्रे दर्शवतात. आजही ह्या चित्रांची भव्यता प्रखलीत दिसते.
सोनेरी महल चे सौंदर्य प्रभावीत करणारे घटक :
- सोनेरी महल च्या पाठीमागील भागात सातमाळा डोंगर रांग आहे. पश्चिम भागात गोगा बाबा डोंगर आणि उत्तरेकडील भागात बुद्ध लेण्या व समोरील बाजूस म्हणजेच पूर्वेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे.
- चारही बाजूने निसर्गाचे दर्शन होते. ज्या मुळे ह्या वास्तू चे सौदर्य आणखी खुलुन दिसते. येथील परिसर हा निसर्गाच्या सानिग्ध्यात वसलेला आहे.
- त्या मुळे शहरातील लोक ह्या भागात सतत मोकळा वेळ घालवण्यासाठी येत असतात. सकाळी ह्या भागात आरोग्याची काळजी करणारे लोकांची वर्दळ असते.
- दिवसा पर्यटक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मधील विद्यार्थ्यांची वर्दळ येथे बघण्यास मिळते. येथील मोकळ्या जागेत संध्याकाळच्या वेळी खेळाडूंची गर्दी देखील येथे दिसते. आसपास चा सर्व परिसर हा पर्यटक ठिकाणांचा आहे.
सोनेरी महल उघडण्याची / बघण्याची वेळ
वार | उघडण्याची वेळ | बंद होण्याची वेळ |
मंगळवार | सकाळी 9:00 ते | संध्याकाळी 5:00 पर्यंत |
बुधवार | सकाळी 9:00 ते | संध्याकाळी 5:00 पर्यंत |
गुरुवार | सकाळी 9:00 ते | संध्याकाळी 5:00 पर्यंत |
शुक्रवार | सकाळी 9:00 ते | संध्याकाळी 5:00 पर्यंत |
शनिवार | सकाळी 9:00 ते | संध्याकाळी 5:00 पर्यंत |
रविवार | सकाळी 9:00 ते | संध्याकाळी 5:00 पर्यंत |
टीप: सोमवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सोनेरी महल बंद असतो. |
सोनेरी महलचे तिकीट दर :
- भारतीय नागरिकांसाठी 10 रु. प्रति व्यक्ती
- परदेशी नागरिकांसाठी 100 रु प्रति व्यक्ती
सोनेरी महल औरंगाबाद – वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
सोनेरी महाल का प्रसिद्ध आहे?
हा महाल मुघल आणि राजपूत स्थापत्यशैलीचे उत्तम उदाहरण असून, यातील भिंतींवर खऱ्या सोन्याने रंगवलेली चित्रे आहेत.
सोनेरी महलची उघडण्याची वेळ काय आहे?
महाल मंगळवार ते रविवार सकाळी 9:00 ते संध्याकाळी 5:00 या वेळेत खुले असते. सोमवार आणि सार्वजनिक सुट्टीला बंद राहते.
सोनेरी महलचे तिकीट दर किती आहेत?
भारतीय पर्यटकांसाठी तिकीट दर ₹10 प्रति व्यक्ती, तर परदेशी पर्यटकांसाठी ₹100 प्रति व्यक्ती आहे.
या महालातील भिंतींवर सोन्याच्या पानांनी रंगवलेली चित्रे असल्यामुळे याला "सोनेरी महल" असे नाव पडले.
सोनेरी महलमध्ये काय बघायला मिळते?
इथे ऐतिहासिक मूर्ती, शस्त्रे, जुनी चित्रे, उत्खननातून मिळालेल्या वस्तू तसेच तीन तोफा पाहायला मिळतात.
सोनेरी महलच्या जवळ अजून कोणती पर्यटनस्थळे आहेत?
बुद्ध लेणी, गोगाबाबा टेकडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, आणि छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय इथे जवळच आहेत.
सोनेरी महलला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ कोणता आहे?
नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा महाल पाहण्यासाठी सर्वोत्तम ऋतू मानला जातो, कारण या काळात हवामान थंड व आल्हाददायक असते.
सोनेरी महालला जाण्यासाठी कोणते वाहन सोयीस्कर आहे?
खाजगी वाहन, टॅक्सी किंवा रिक्षा सोयीस्कर पर्याय आहेत. शहरातील बस स्थानकापासून हा महाल सुमारे 6 किमी अंतरावर आहे.
सोनेरी महल कोणत्या राजवटीत बांधला गेला?
सोनेरी महल औरंगजेबाच्या काळात बुंदेलखंडच्या सरदार पहाडसिंग यांनी 1651 ते 1653 दरम्यान बांधला होता.
सोनेरी महलमध्ये कोणत्या स्थापत्यशैलीचा प्रभाव आहे?
हा महाल मुघल आणि राजपूत स्थापत्यशैलीचे एक उत्तम उदाहरण आहे.
सोनेरी महल कोणत्या ऐतिहासिक व्यक्तीशी संबंधित आहे?
महालाचे बांधकाम सरदार पहाडसिंग यांनी केले होते, तसेच त्यांचे चुलत भाऊ लाला हरदौल हे बुंदेलखंडचे स्वातंत्र्यसैनिक होते, ज्यांची स्मृती येथे आहे.
सोनेरी महलला भेट देण्यासाठी काही विशिष्ट ड्रेस कोड आहे का?
नाही, येथे कोणताही विशिष्ट ड्रेस कोड नाही. मात्र, भारतीय ऐतिहासिक स्थळ असल्याने सभ्य पोशाख घालावा.
सोनेरी महलला जाण्यासाठी कोणता सर्वात जवळचा रेल्वे स्थानक आणि विमानतळ आहे?
- रेल्वे स्थानक: छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) रेल्वे स्थानक (सुमारे 6 किमी)
- विमानतळ: छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विमानतळ (सुमारे 12 किमी)
सोनेरी महलमध्ये गाईड सेवा उपलब्ध आहे का?
नाही, सध्या अधिकृत गाईड सेवा उपलब्ध नाही. मात्र, महालाविषयी माहिती देणारे फलक आणि काही माहिती केंद्रे येथे आहेत.
सोनेरी महलला भेट देण्यास किती वेळ लागतो?
साधारणतः 1 ते 2 तास महाल बघण्यासाठी पुरेसे असतात.
सोनेरी महल हे छायाचित्रण व निसर्गप्रेमींना आकर्षित करणारे ठिकाण आहे का?
होय, सोनेरी महलच्या ऐतिहासिक सौंदर्यासह सातमाळा पर्वतरांगांचा निसर्गरम्य परिसर छायाचित्रकारांसाठी उत्तम ठिकाण आहे.
सोनेरी महलच्या आत भोजन किंवा नाश्ता नेण्यास परवानगी आहे का?
नाही, महालाच्या आत बाहेरून अन्न नेण्यास परवानगी नाही.
सोनेरी महल आणि अजिंठा-वेरूळ लेणी यांच्यातील अंतर किती आहे?
- सोनेरी महल ते अजिंठा लेणी: सुमारे 100 किमी
- सोनेरी महल ते वेरूळ लेणी: सुमारे 35 किमी
सोनेरी महलच्या आजूबाजूला कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी उत्तम ठिकाणे कोणती आहेत?
बुद्ध लेणी, गोगाबाबा टेकडी, सिद्धार्थ गार्डन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर हे चांगले पर्याय आहेत.
महाराष्ट्राची पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) बघण्याचे नियोजन करा आमच्या सोबत:
- महाराष्ट्रातील पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरातील ऐतिहासिक स्थळांची सैर करण्यासाठी प्रवाशांच्या विशिष्ट गरजा आणि प्राधान्यतेप्रमाणे.
- आम्ही एकटे प्रवासी, कुटुंबे आणि सर्व आकारांच्या गटांना सामावून घेणाऱ्या आलिशान सेडानपासून ते प्रशस्त SUV पर्यंत विविध सर्व प्रकारच्या सुव्यवस्थित वाहनांची टैक्सी सेवा प्रदान करतो.
- विमानतळ हस्तांतरणापासून ते शहराच्या सहलीपर्यंत आणि त्याही पुढे, आम्ही आमच्या सेवा तुमच्या प्रवासाच्या कार्यक्रमानुसार तयार करतो.
- सर्व प्रसिद्ध ऐतिहासीक स्थळांसाठी टैक्सी सेवा देतो. तुम्ही या लेखामध्ये औरंगाबाद ऐतिहासिक शहरात काय प्रसिद्ध आहे? जाणून घ्या ह्या प्रश्नाचे उत्तर खालील उताऱ्या मध्ये :
- 1. अजिंठा लेणी
- 2. वेरूळ लेणी
- 3. औरंगाबाद लेणी
- 4. पितळखोरा लेणी
- 5. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर
- 6. भद्रा मारुती मंदिर
- 7. देवगिरी किल्ला
- 8. बीबी का मकबरा
- 9. पानचक्की
- 10. सिद्धार्थ गार्डन
- 11. पैठण चे नाथ सागर धरण
- 12. सोनेरी महल
- 13. छत्रपती शिवाजी संग्रहालय
- 14. प्रोजोन मॉल
- 15. सलीम अली तलाव आणि पक्षी अभयारण्य
- 16. कैलास मंदिर
- 17. औरंगजेबाची कबर (खुलताबाद)
- 18. खंडोबा मंदिर
- 19. साई टेकडी घाट
- 20. जैन मंदिर (कचनेर)
- 21. म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण
- 22. H२O वॉटर पार्क
- 23. भांगसी माता गड
- 24. मलिक अंबर कबर
- 25. नवसाला पावणारा राजुरेश्वर गणपती
- 26. लोकुत्तरा महाविहार, (चौका औरंगाबाद)
- 27. संत एकनाथ महाराज समाधी मंदिर
ह्या पेक्ष्या अधिक स्थळांना भेट देण्यासाठी आम्ही औरंगाबाद शहरातून तुमच्या पोहचण्याच्या स्थळापर्यंत टैक्सी ची सेवा आपणास उपलब्ध करून देतो. अनुभवी आणि एक्स्पर्ट चालकांसोबत आपण ऐतिहासिक पर्यटन नगरीची सैर करा.
अद्विका टैक्सी ला आत्ताच बुक करा आणि आपले औरंगाबाद शहर किवा त्या बाहेरील स्थळांना भेट द्या . चला मग कळवा तुमचा ट्रीप चा प्लान अद्विका टैक्सी ला 9359604272 वर कॉल करून.
Explore More Aurangabad Sightseeing Blogs
Sightseeing Places Blog (English)
- Visit the Tomb of Aurangzeb & Khuldabad: History, Death Place & Tourist Attractions in Chhatrapati Sambhajinagar (Aurangabad) | Complete Travel GuidVisit the Tomb of Aurangzeb & Khuldabad: History, Death Place & Tourist Attractions in Chhatrapati Sambhajinagar (Aurangabad) | Complete Travel Guide
- Salim Ali Lake Sarovar, Aurangabad: History, Bird Sanctuary, Timings, Entry Fee, How to Reach & Nearby Places – Latest Updated Info
- Siddharth Garden and Zoo Aurangabad: History, Location, Ticket Price, Timings, Attractions, and More – Your Complete Travel Guide
- Panchakki Aurangabad Maharashtra: Timings, Entry Fee, History, and Complete Travel Guide
- “Chhatrapati Shivaji Maharaj Museum Aurangabad” – Complete 2024 Guide & Visitor Information
- Ellora Caves: Situated, History, Timings, Entry, Architecture, Images & More Detailed information
- Ajanta Caves: Location, History, Travel Tips, Entry Fee, Visiting Timings, and More.
- Grishneshwar Jyotirlinga
- Detailed information Aurangabad New Name
- Ajanta Caves World Heritage Site.
- Best Tourist Places to Visit in Aurangabad
Taxi Travel Blog (English)
- Ajanta Ellora Taxi Services: Best Time to Visit, Taxi Fare, Location Travel Guide, and How to Reach Ajanta & Ellora Caves from Aurangabad
- Aurangabad to Ajanta Caves Taxi
- Best Popular Sightseeing Cab Booking Service in Aurangabad
- Book Your Cheapest Taxi Fare for Aurangabad to Ellora Caves Tours & Trip.
- Chhatrapati Sambhajinagar (Aurangabad) Cabs Service: Explore Local Sightseeing Places & Packages.
Sightseeing Places Blog (Marathi) : औरंगाबादची प्रेक्षणीय स्थळे
- दक्षिणेतील ताजमहल-बीबी का मकबराची सर्व माहिती मराठीत बघा वेळ, तिकीट, पोहचण्याचा रस्ता-मार्ग, जवळील पर्यटन स्थळे, इतिहास.
- Latest 2024 दौलताबाद देवगिरी किल्ल्याची संपूर्ण माहिती। Daulatabad Fort information in Marathi
- Latest 2024 अजिंठा लेणी ची माहिती मराठीत | Ajanta Caves information in Marathi
- 2024 औरंगाबाद वेरूळ लेणी आणि कैलास लेणी बद्दल संपूर्ण मनोरंजक महत्वाची माहिती मराठीत पहा.
- 24+ फेमस औरंगाबाद पर्यटन स्थळे
- घृष्णेश्वर मंदिर मराठी माहिती
- सोनेरी महल औरंगाबाद – ऐतिहासिक ठिकाण आणि त्याची संपूर्ण माहिती
- छत्रपती संभाजीनगर बसचे तिकीट दर.
- औरंगाबाद मधील भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणे
- औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर कसे झाले ?
Comments are closed