2025 औरंगाबाद वेरूळ लेणी आणि कैलास लेणी बद्दल संपूर्ण मनोरंजक महत्वाची माहिती मराठीत पहा.

  • Home
  • मराठी ब्लॉग
  • 2025 औरंगाबाद वेरूळ लेणी आणि कैलास लेणी बद्दल संपूर्ण मनोरंजक महत्वाची माहिती मराठीत पहा.

वेरूळ लेणी माहिती मराठी (Ellora Caves Information in Marathi)

  • वेरूळ लेणी हि औरंगाबाद रेल्वे स्टेशन पासून सरासरी ३० किमी अंतरावर आहे.
  • हि एलोरा लेणी कैलास लेणी नावाने देखील ओळखले जाते.
  • जगप्रसिद्ध एलोरा लेणी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हात वेरूळ गावाजवळ आहे.
  • या लेणीला बघण्यासाठी लाखोच्या संख्येने भारतीय तसेच विदेशी पर्यटक दरवर्षी हजेरी लावतात.
  • कारण ह्या लेणीच्या जवळच घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आहे जे एक भगवान शिवजी चे एक जगप्रसिद्ध श्रद्धा स्थान आहे. त्या मुळे नेहमीच येथे पर्यटकांची वर्दळ बघण्यास मिळते.
  • वेरूळ लेणी मध्ये आपणास बुद्ध, हिंदू व जैन समुद्याचा एकत्रित त्रिवेणी संगम बघण्यास मिळतो.
  • त्यामुळे सर्व धर्म समुदायाचा वर्ग आपणास येथे बघण्यास मिळतो.
  • वेरूळ लेणी ला वेरूळ म्हणून जास्त प्रमाणात बोलले जाते. ह्या लेणी जवळ ऐलोगंगा नावाची नदी वाहते. ह्या लेणीस ऐलोरा लेणी असे नाव प्राप्त झाले.

औरंगाबाद वेरूळ लेणी (Verul Leni Information in Marathi)

पाचव्या ते दहाव्या शतक कालखंडात सह्याद्री पर्वत रांगेतील सातमाळा डोंगर रांगेत हि विशाल काय खडकाच्या एकसंलग्नन खडकात वेरूळ लेणी (Aurangabad Verul Leni) कोरलेली आहे.

(Verul Leni Information in Marathii) मध्ये आपण बघणार आहोत. येथे ऐकून ३४ लेण्या आहेत ज्या बुद्ध, हिंदू व जैन धर्माचे त्या काळातील कला शिल्प स्थापत्य शैलीचे अनोखे दर्शन करण्यास मिळते.

अति प्राचीन वास्तूंचा ठेवा जपण्यासाठी १९५१ साली भारत सरकारने ह्या लेण्यांना ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित केले.

व त्यानंतर ह्या लेणी भारत सरकारच्या पुरातत्त्व विभागाकडे हस्तांतरित केली गेली.

सांस्कृतिक माहितीच्या आधारावर हा ठेवा जपण्यासाठी वेरूळ लेणीस १९८३ साली संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) युनोस्कोने जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट केले.

१९८३ साली वेरूळ लेणी बरोबरच अजिंठा  लेणी, आग्रा येथील ताजमहाल व आग्रा किल्ला ह्या ४ वास्तू सांस्कृतिक माहिती देणाऱ्या आहेत ह्या कारणाने जपल्या जाव्यात म्हणून जागतिक वारसा स्थळे म्हणून घोषित केल्या.

वेरूळ लेणीची रचना (Verul Leni Structure)

वेरूळ च्या ऐकून ३४ लेणीची रचना तीन प्रकारच्या समूहात विभागल्या गेल्या आहेत.

१ ते १२
बौद्ध लेण्यांचा समूह

१३ ते २९
हिंदू लेणी समूह

३० ते ३४
जैन लेणी समूह

वेरूळ लेणी मधील ३४ लेणी पैकी दक्षिणी भागात लेणी क्रमांक 1 ते 12 बौद्ध लेण्यांचा समूह आहे, मध्य भागात लेणी क्रमांक १३ ते २९ हिंदू लेणी व उत्तरी भागात ३० ते ३४ जैन लेणी बघण्यास मिळतात.

(Verul Leni Structure) लेणीची रचना बघितली गेली तर मध्य भागात च हिंदू लेणीची महत्वपूर्ण अशी कैलास लेणी दर्शनी भागात आढळते.

प्रवेश केल्या नंतर कैलास लेणीच्या आतील भागात भव्य मोठ्या खडकात “आधी कळस मग पाया” या वचनानुसार शिखराची निर्मिती अगोदर, नंतर गाभारा व पायथ्याचा भाग बनवला गेलेली असी अदभूत शिल्प स्थापत्य शैली बघण्यास मिळते.

समोरच्या भागात भव्य द्वार मंडप अतिउंच अशी कोरीव दोन हत्ती व दोन ध्वज स्तंभ दोन्ही बाजूने खडकात कोरलेली आहेत.

त्याच पायथ्यालाच पाण्याचा निचरा होण्यासाठी मोठे खडकाच्या आतमध्येच बीळे लेणीच्या चारही बाजूने बघायला मिळतात.

लेणीच्या भित्तीवर कोरीव खडकात अद्वितीय शिल्पकला ज्यात गौतम बुद्धांची भावमय मूर्ती,

भगवान शिवजी च्या तांडव करतांना असलेल्या अनेक वेगवेगळ्या भावमुद्रा तसेच ब्रम्हा, विष्णू, महेश देवतांचे मूर्ती देखील बघायला मिळतात.

भिंतीवर शिल्पात कोरलेल्या या मुर्तीसोबतच वेरूळ लेणीत बौद्ध धर्मीय चैत्य,विहार तसेच स्तूप बघायला मिळते.

जैन धर्मीय २३ वे तीर्थकार पार्श्वनाथ यांची विशाल शिल्प कलेत असलेली शिल्प कला रचना देखील बघण्यास मिळते.

स्थापत्य शैलीचा विचार केला तर हि वेगळीच शिल्पस्थापत्य कला आपणास येथे बघायला मिळते.

कर्नाटक मधील विरुपाक्ष मंदिर व कांची येथील कैलास मंदिराच्या रचनेसारखीच शिल्पस्थापत्य कला आढळते.

वेरूळ येथील लेणी क्रमांक १ ते १२ बौद्ध लेण्यांचा संशिप्त आढावा. Buddhist Caves (Cave No. 01 to 12)

  • वेरूळ लेणीच्या दक्षिणी भागात Buddhist Caves (Cave No. 01 to 12) 01 ते 12 क्रमांक बौद्ध लेणी आढळतात.
  • ह्या लेण्यांचा विचार केला तर संपूर्ण लेण्या ह्या खडकात कोरलेल्या आहेत.
  • यामध्ये  चैत्यगृह जी बुद्ध भिक्कुंसाठी प्रार्थनास्थळ म्हणून उपयोगात आणले जात असत.
  • गौतम बुद्धांची ध्यान मूर्ती, भिंतीवर सम्राट अशोक काळातील धम्मचक्र बुद्ध व बौद्ध विभुतींच्या मूर्तींच्या आकृती दगडात कोरलेल्या आढळतात.
  • तसेच बुद्ध धर्मातील हत्ती,सर्प यांसारख्या प्राण्यांची शिल्प देखील आहेत.
  • लेण्यांच्या छतावर कमळाकृती आकाराच्या चित्रकला दगडात कलर स्वरुपात कोरलेल्या दिसतात.
  • भिक्कुंसाठी निवास स्थाने म्हणून विहारांची निर्मिती केली गेली.
  • त्यात स्वयंपाकघरे, स्नानगृहे, विश्रामगृहे, यांसारखी रचना बघायला मिळते.
वेरूळ लेणी औरंगाबाद

वेरूळ येथील लेणी क्रमांक १३ ते २९ हिंदू लेण्यांचा संशिप्त आढावा.
2. Hindu Caves (Cave No. 13 to 29)

वेरूळ लेणी औरंगाबाद
  • वेरूळ लेण्यांच्या अगदी दर्शनी मध्य भागातच प्रवेश द्वार मध्ये आपणास Hindu Caves
    (Cave No. 13 to 29) हिंदू लेण्यांचा भाग बघण्यास मिळतो.
  • त्यामधील लेणी क्रमांक १५ मध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश देवतांची शिल्प मूर्ती आढळतात.
  • त्यांच्या सोबतच दासी स्त्रिया नृत्यागिनी स्त्रिया , भगवान शिवजी ची तांडव नृत्य कला मध्ये असणारी शिल्प कला आपणास बघायला मिळते.
  • हिंदू लेणी पैकी अति महत्वाच्या लेणी म्हणजे १६ क्रमांकाची कैलास लेणी होय.

वेरूळ येथील कैलास लेणे (Verul Leni Kailash Mandir)

Verul Leni Kailash Mandir
  • वेरूळ लेणी (Verul Leni Kailash Mandir) मधील कैलास मंदिराची अप्रतिम शिल्पकला बघून मन भक्तिभावाने प्रसंनीत होते.
  • कैलास लेणीची निर्मिती हि इ.सन ७५७ ते ७८३ या काळामध्ये झाली असावी. कारण लेणी क्रमांक १० च्या भिंतीवर राष्ट्रकुट राजा दंतीदुर्ग यांचा शिलालेख आपणास बघण्यास मिळतो.
  • वेरूळ येथील कैलास लेणे (Verul Leni Kailash Mandir) ची निर्मिती राष्ट्रकुट राजा कृष्णप्रथम च्या काळात निर्मिती ची प्रक्रिया सुरु झाली असावी असे इतिहासकार म्हणतात.
  • कैलास लेणी हि पृथ्वीवर अवतरलेला जणू स्वर्गच आहे. २७६ फुट लांब आणि १५४ फुट रुंदीच्या आकारमान आपणास मिळतो.
  • कैलास लेणी मंदिर म्हणजे अखंड खडकशिलातून निर्माण केलेले अलोकिक शिल्पकला आहे. २९ मिटर रुंद ५० मीटर लांब आणि ३३ मीटर रुंद असे कैलास लेण्यांचे आकारमान आहे शिवदेवताचे निवासस्थान म्हणून ह्या लेण्याना कैलास लेणी असेही म्हणतात.
  • पूर्ण बर्फात कैलास लेणी दिसावी म्हणून पूर्ण प्लास्टर केलेले होते. काळाच्या ओघात हे प्लास्टर निघले. आजही पांढर्या शुभ्र प्लास्टर च्या छटा भीतीवर आपणास बघायला मिळतात.
  • वेरूळ येथील कैलास लेणीवर शिव व पार्वती साकारलेले दिसते. व रावण खालच्या बाजूने हा कैलास पर्वत उचलून हलवतो आहे अशी अद्वितीय कल्पनात्मक रचना साक्षात येथे साकारलेली आपणास दिसते म्हणून ह्या लेणीस कैलास लेणी नाव मिळाले. असे बरेच थोर इतिहासकार म्हणतात.
  • कैलास लेणीची (Verul Leni Kailash Mandir) निर्मिती “आधी शिखर मग पाया” असी करण्यात आली आहे.
  • कैलास लेणी मोनोलिथिक संरचनेचा एक महत्वपूर्ण प्रकार आहे. इतिहासकाराच्या मते सरासरी १५० वर्ष काळ लेणी बनवण्यास लागला असावा असे म्हंटले जाते.

वेरूळ येथील लेणी क्रमांक ३० ते ३४ जैन लेण्यांचा संशिप्त आढावा.
3. Jain Caves (Cave No. 30 to 34)

  • ऐकून पाच लेण्या ( Jain Caves
    (Cave No. 30 to 34) या मध्ये आपणास बघायला मिळतात.
  • वेरूळ लेण्यांच्या उत्तरी भागात ह्या लेण्या आहेत.
  • जैन लेण्यांवर बुद्ध लेण्यांचा स्थापत्य कलेचा प्रभाव आपणास दिसतो. कारण ह्या बुद्ध लेणी व जैन लेणी मधील कोरीव काम साम्य दिसते.
  • जैन धर्मीय २३ वे तीर्थकार पार्श्वनाथ यांची शिल्प मुद्रा व प्रार्थना गृह आहे.
  • वेरूळ लेणी या लेण्यांचे खोदकाम आधी कळस मग पाया या वचनानुसार करण्यात आले आहे.
  • इतकेच नव्हे तर या लेण्याचे खोदकाम पहाडाच्या शिखरापासून प्रारंभ करून पायथ्यापर्यंत येत अलोकिक शिल्प साकारण्यात आलेले आहे.
वेरूळ लेणी औरंगाबाद

वेरूळ लेणी कोणत्या जिल्हात/ तालुक्यात आहे ? Where is Ellora Caves Located?

वेरूळ लेणी हि महाराष्ट्र राज्याच्या छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हातील खुलताबाद तालुक्यातील वेरूळ गावाजवळ आहे. हि लेणी सह्याद्रीच्या सातमाळा डोंगर रांगात वसलेली आहे.

वेरूळ लेणीचा संपूर्ण पत्ता पुढीलप्रमाणे (Ellora Caves Location)

देशभारत
राज्यमहाराष्ट्र
जिल्हाछत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
तालुकाखुलताबाद
गाववेरूळ
पोस्ट ऑफिसखुलताबाद
पिन कोड४३११०२

वेरूळ लेणीला भेट देण्याची वेळ (Ellora Caves Timings)

वारउघडण्याची वेळबंद होण्याची वेळ
रविवारसकाळी 06 वाजता पर्यटकांसाठी खुली होते.संध्याकाळी 06 वाजता बंद होते.
सोमवारसकाळी 06 वाजता पर्यटकांसाठी खुली होते.संध्याकाळी 06 वाजता बंद होते.
मंगळवार*दर मंगळवारी वेरूळ लेणी बंद असते.
बुधवारसकाळी 06 वाजता पर्यटकांसाठी खुली होते.संध्याकाळी 06 वाजता बंद होते.
गुरुवारसकाळी 06 वाजता पर्यटकांसाठी खुली होते.संध्याकाळी 06 वाजता बंद होते.
शुक्रवारसकाळी 06 वाजता पर्यटकांसाठी खुली होते.संध्याकाळी 06 वाजता बंद होते.
शनिवारसकाळी 06 वाजता पर्यटकांसाठी खुली होते.संध्याकाळी 06 वाजता बंद होते.

वेरूळ लेणीचा तिकीट दर (Verul Leni Ticket Price)

भारतीय नागरिकांसाठी४०  रु. प्रति व्यक्ती
सार्क देशांचे नागरिक४०  रु. प्रति व्यक्ती
परदेशी पर्यटक६०० रु. प्रति व्यक्ती
०-१५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही

अजिंठा आणि वेरूळ लेणी ची तिकीट ऑनलाईन बुकिंग प्रक्रिया पहा.

वेरूळ लेण्यांना कसे जायचे? (How to reach Verul Caves?)

वेरूळ लेणी पाहण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यावे लागते. येथे पोहोचण्यासाठी तीन मार्ग आहेत.

  • १. हवाई वाहतूक
  • २. रेल्वे वाहतूक
  • ३. रस्ते वाहतूक

१. हवाई वाहतूक

Havai Vahtuk
  • छत्रपती संभाजीनगर मध्ये येण्यासाठी आपण हवाई वाहतूकीचा प्रवास निवडू शकता.
  • येथे औरंगाबाद विमानतळ (IXU) नावाचे विमानतळ आहे.
  • ह्या ठिकाणी दिल्ली, हैद्राबाद, मुंबई साठी डायरेक्ट उडाने होतात.
  • ह्या ठिकाणी पोहचल्यावर आपण पुढील दोन पर्याय वापरून वेरूळ लेणी पर्यंत पोहचू शकता.
  • १. महाराष्ट्र शासनाच्या (MSRTC) बस ने वेरूळ लेणी ला जाऊ शकता.
  • २.टैक्सी बुकिंग करून आपण तेथे जाऊ शकता.
    (* वेळ वाचवण्यासाठी टैक्सी बुकिंग हा पर्याय योग्य आहे.)
  • टैक्सी बुकिंग करण्यासाठी येथे क्लिक करा.

२. रेल्वे वाहतूक

RAilway Vahtuk
  • रेल्वे मार्गाने येण्यासाठी आपणास येथील औरंगाबाद(AWB) रेल्वे स्टेशन ला यावे लागेल.
  • औरंगाबाद रेल्वे स्टेशन हे मनमाड जंक्शन व हजूर साहिब नांदेड जंक्शन दरम्यानचे मोठे स्टेशन आहे.
  • ह्या मार्गावर रोज अजंठा एक्स्प्रेस, निजामाबाद-पुणे एक्स्प्रेस, मराठवाडा एक्स्प्रेस, सचखंड एक्स्प्रेस, तपोवन एक्स्प्रेस, नागरसोल एक्स्प्रेस, पुणे एक्स्प्रेस, नंदीग्राम एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेस, हजूर साहिब नांदेड-मनमाड डेमू, मुंबई CSMT राजा राणी एक्स्प्रेस ह्या गाड्या रोज चालत असतात.
  • ह्या स्टेशन वरून वेरूळ लेणी पर्यंतचा प्रवास
  • १. महाराष्ट्र शासनाच्या (MSRTC) बस ने वेरूळ लेणी ला जाऊ शकता.
  • २.टैक्सी बुकिंग करून आपण तेथे जाऊ शकता.
    (* वेळ वाचवण्यासाठी टैक्सी बुकिंग हा पर्याय योग्य आहे.)
  • टैक्सी बुकिंग करण्यासाठी येथे क्लिक करा.

३. रस्ते वाहतूक

Raste Vahtuk
  • रस्ते वातुकीचा मार्ग हा स्वत: च्या वाहनाद्वारे किंवा महाराष्ट्र शासनाच्या (MSRTC) बस सेवेचा वापर करून आपण छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रवेश करू शकता.
  • रस्ते वातुकीने बस सेवेचा वापर करून छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती बस स्थानका पर्यंत पोहचू शकता.
  • त्यानंतर
  • १. महाराष्ट्र शासनाच्या (MSRTC) बस ने वेरूळ लेणी ला जाऊ शकता.
  • २.टैक्सी बुकिंग करून आपण तेथे जाऊ शकता.
    (* वेळ वाचवण्यासाठी टैक्सी बुकिंग हा पर्याय योग्य आहे.)
  • टैक्सी बुकिंग करण्यासाठी येथे क्लिक करा.

    Read More

    महाराष्ट्राची पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) बघण्याचे नियोजन करा आमच्या सोबत:

    महाराष्ट्रातील पर्यटन राजधानी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरातील ऐतिहासिक स्थळांची सैर करण्यासाठी प्रवाशांच्या विशिष्ट गरजा आणि प्राधान्यतेप्रमाणे.

    आम्ही एकटे प्रवासी, कुटुंबे आणि सर्व आकारांच्या गटांना सामावून घेणाऱ्या आलिशान सेडानपासून ते प्रशस्त SUV पर्यंत विविध सर्व प्रकारच्या सुव्यवस्थित वाहनांची टैक्सी सेवा प्रदान करतो.

    विमानतळ हस्तांतरणापासून ते शहराच्या सहलीपर्यंत आणि त्याही पुढे, आम्ही आमच्या सेवा तुमच्या प्रवासाच्या कार्यक्रमानुसार तयार करतो.

    सर्व प्रसिद्ध ऐतिहासीक स्थळांसाठी टैक्सी सेवा देतो. तुम्ही या लेखामध्ये औरंगाबाद ऐतिहासिक शहरात काय प्रसिद्ध आहे? जाणून घ्या ह्या प्रश्नाचे उत्तर खालील उताऱ्या मध्ये :

    • 11. पैठण चे नाथ सागर धरण
    • 12. सोनेरी महल
    • 13. छत्रपती शिवाजी संग्रहालय
    • 14. प्रोजोन मॉल
    • 15. सलीम अली तलाव आणि पक्षी अभयारण्य
    • 16. कैलास मंदिर
    • 17. औरंगजेबाची कबर (खुलताबाद)
    • 18. खंडोबा मंदिर
    • 19. साई टेकडी घाट
    • 20. जैन मंदिर (कचनेर)
    • 21. म्हैसमाळ थंड हवेचे ठिकाण
    • 22. H२O वॉटर पार्क
    • 23. भांगसी माता गड
    • 24. मलिक अंबर कबर
    • 25. नवसाला पावणारा राजुरेश्वर गणपती
    • 26. लोकुत्तरा महाविहार, (चौका औरंगाबाद)
    • 27. संत एकनाथ महाराज समाधी मंदिर

    ह्या पेक्ष्या अधिक स्थळांना भेट देण्यासाठी आम्ही औरंगाबाद शहरातून तुमच्या पोहचण्याच्या स्थळापर्यंत टैक्सी ची सेवा आपणास उपलब्ध करून देतो. अनुभवी आणि एक्स्पर्ट चालकांसोबत आपण ऐतिहासिक पर्यटन नगरीची सैर करा.

    अद्विका टैक्सी ला आत्ताच बुक करा आणि आपले औरंगाबाद शहर किवा त्या बाहेरील स्थळांना भेट द्या . चला मग कळवा तुमचा ट्रीप चा प्लान अद्विका टैक्सी ला 9359604272 वर कॉल करून.

    Comments are closed